हनिमूनसाठी कुठे जावं? बर्फापासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत हे रोमँटिक ठिकाण ठरतात कपल्सची पहिली पसंत
अंदमान बेट
तुम्हाला शांत वातावरण आणि समुद्रकिनारी आपला हनिमून घालवायचा असेल तर अंदमान तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल. कपल्स इथे स्नॉर्कलिंग आणि स्कूबा डायव्हिंगसारख्या ॲक्टिव्हिटीजचा अनुभव घेऊ शकतात. तथापि, बाकी पर्यायांहून या ठिकाणाचे बजेट थोडे जास्त जाऊ शकते, पण इथे तुम्हाला एक सुंदर वेळ घालवता येईल हे निश्चित आहे. अंदमानला भेट देण्यासाठी विमानाचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. अंदमानला जाण्यासाठी थेट रेल्वे किंवा रस्ते मार्ग उपलब्ध नाही. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक ऐतिहासिक स्मारक सेल्यूर जेल देखील तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सूर्यास्तावेळी समुद्रकिनारी तुम्ही सुंदर फोटोज क्लिक करु शकता.
काश्मीर
समुद्रकिनाऱ्यांना भेट देऊन बोर झाला असाल आणि हनिमूनसाठी तुम्ही बर्फाळ ठिकाणांचा विचार करत असाल तर काश्मीरहून उत्तम ठिकाण नाही. येथील श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगाम हे हनिमूनसाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जातात. काश्मीरमध्ये धर्तीवरील स्वर्ग पाहिल्यासारखे वाटते असे मानले जाते. कपल्स इथे शिकारा राइड, पर्वतांचे दृष्य आणि डोंगराळ एक्टीव्हीटीजमध्ये भाग घेऊ शकतात. बर्फाच्या जमिनीवर इथे तुम्ही स्कीइंगचा आनंद लुटु शकता.
गोवा
भारतीयांमध्ये गोव्याचे आकर्षण काही वेगळेच असते. येथील समुद्रकिनारा आणि ओव्हरऑल व्हाईब लोकांना या ठिकाणी जास्त आकर्षित करते. इथे तुम्ही सी-फूडचा आस्वाद घेऊ शकता, संध्याकाळी समुद्रकिनारी फेरफटका मारु शकता आणि दिवसा आपले सुंदर फोटोशूट करु शकता. इथे अनेक ऐतिहासिक चर्च देखील पाहायला मिळतील.
फेस्टिव्ह सिजनमध्ये रेल्वेने प्रवास करताय? 1 ऑक्टोबरपासून लागू झालेत हे नवे नियम
उदयपुर
हनिमूनमध्ये जर तुम्ही रोमँटिकसह शाही वातावरणाचा अनुभव घेऊ इच्छित असाल तर उदयपूर तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल. इथे तुम्ही तलावांची सफर, ऐतिहासिक राजवाड्यांची सफर आणि सुंदर सूर्यास्ताचा आनंद लुटु शकता. येथील पारंपारिक जेवण आणि बाजारपेठ देखील तुमच्या पार्टनरला खुश करुन जाईल.






