Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा ‘या’ पौष्टिक पदार्थांचा समावेश

शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यामुळे शरीराला भरपूर पोषक घटक मिळतील. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 05:30 AM
लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचा समावेश

लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यामुळे होऊ शकतो ॲनिमिया, दुर्लक्ष न करता आहारात करा 'या' पौष्टिक पदार्थांचा समावेश

Follow Us
Follow Us:

रक्ताची कमतरता कशामुळे निर्माण होते?
हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसणारी लक्षणे?
लाल रक्तपेशी वाढवण्यासाठी काय खावे?

कामाची धावपळ, कौटुंबिक जबाबदाऱ्या, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा शरीरातील हिमोग्लोबिन पातळी कमी झाल्यानंतर फारसे लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसून येतो. हिमोग्लोबिनची पातळी झपाट्याने कमी झाल्यामुळे ॲनिमिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देऊन आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. लाल रक्तपेशींची पातळी कमी झाल्यानंतर शरीराला आवश्यक असलेले ऑक्सिजन मिळत नाही. यासोबतच थकवा, चक्कर, फिकट त्वचा होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच विकसनशील देशांमध्ये महिला आणि मुलांमध्ये ॲनिमिया होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ गंभीर लक्षणे, उलट्या- जुलाब थांबण्यासाठी करा घरगुती उपाय

गर्भवती महिलांची लोह किंवा आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. बऱ्याचदा रक्त कमी झाल्यानंतर छोटी मोठी काम करताना खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तर काहीवेळा अचानक चक्कर येते. डिहायड्रेशन किंवा थकवा समजून शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • थोडस चालल्यानंतर लगेच धाप किंवा दम लागणे
  • चेहरा, नखे आणि डोळ्यांच्या खालचा भाग पांढरा फिकट दिसणे
  • ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदय वेगाने धडधडते
  • टोकाकडील भागांना उष्णता
  • मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे काम करताना अडथळे निर्माण होणे
Fatty Liver To Cirrhosis: 35 वर्षांखालील तरुणांचा जीव धोक्यात केवळ एका चुकीमुळे ; आरोग्य तज्ज्ञांचा मोठा खुलासा

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी शाकाहारी आहार

शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालक, बीट, गाजर यांचा नियमित समावेश करावा. रोजच्या आहारात बीटचा रस बनवून प्यायल्यास शरीरातील रक्ताची पातळी भरून निघते. गूळ-शेंगदाणे, काळे चणे, मसूर डाळ, राजमा, खजूर, काळे मनुके, अंजीर, बदाम, डाळिंब, सफरचंद आणि टरबूज इत्यादी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. या पदार्थांच्या सेवनामुळे महिनाभरात तुमचे कमी झालेले रक्त भरून निघण्यास मदत होईल. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये लोह आणि विटामिन बी १२ मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय मासे आणि खेकडे खाल्ल्यास शरीराला भरपूर ऊर्जा मिळेल आणि थकवा, अशक्तपणा कमी होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ॲनिमिया म्हणजे काय?

    Ans: ॲनिमिया हा आजार लाल रक्तपेशी (RBC) किंवा हिमोग्लोबिनची पातळी कमी झाल्यामुळे होतो.

  • Que: ॲनिमिया टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?

    Ans: पालक, बीट, डाळी, खजूर, मनुके, अंडी, मांस आणि लोहयुक्त अन्न खावे.

  • Que: ॲनिमियाची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा फिकट दिसणे, श्वास घेण्यास त्रास ही सामान्य लक्षणे आहेत.

Web Title: Decrease in red blood cell levels can lead to anemia without neglecting to include these nutrients in the diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • fruits for hemoglobin
  • Health Care Tips
  • healthy food

संबंधित बातम्या

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ
1

Kidney Detox Food: किडनीमधील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी खा ‘हे’ हेल्दी पदार्थ, शरीर होईल स्वच्छ

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल
2

No Sugar Benefits:साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास १४ दिवसांमध्ये लिव्हर-मेंदूच्या आरोग्यात दिसून येतील सकारात्मक बदल

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण
3

HPV Vaccination: उद्याच्या कर्करोगापासून आजच मिळवा संरक्षण! सायन रुग्णालयात HPV लसीकरण मोहिमेला यश, १,००० डोसची मोहीम पूर्ण

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी
4

Kidney Health: लघवीच्या रंगात दिसलेल्या ‘या’ बदलांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! इनफेक्शन वाढल्यास किडनी- लिव्हर होईल कायमचे निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.