सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही? मग कोमट पाण्यात मिक्स करा 'हा' पदार्थ
अपचनाची समस्या कशामुळे उद्भवते?
जिरं ओवा खाण्याचे फायदे?
हेल्दी डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची कृती?
धावपळीची जीवनशैली, कामाचा तणाव, आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव निर्माण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात.याशिवाय आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे कायमच पौष्टिक आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करावे. दिवसाची सुरुवात आनंदी आणि उत्साहाने होण्यासाठी सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ होणे आवश्यक आहे. पण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित होत नाही. आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमध्ये तशीच साचून राहते. यामुळे पोटात जडपणा जाणवू लागतो.(फोटो सौजन्य – istock)
पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे पोटात वेदना, ऍसिडिटी, अपचन आणि गॅसची समस्या उद्भवते. वारंवार आतड्यांमध्ये जमा होणाऱ्या गॅसमुळे पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो. खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात कोणता पदार्थ मिक्स करून प्यावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्यासोबतच पचनाच्या समस्या कधीही उद्भवणार नाही.
प्रत्येक स्वयंपाक घरात ओवा आणि जिरं असतंच. जिऱ्याचा वापर जेवणाला फोडणी देण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि सुगंध वाढण्यास मदत होते. डाळ किंवा इतर कोणताही पदार्थ बनवताना जिऱ्याचा वापर करावा. पोट दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ओवा खाल्ला जातो. या दोन्ही मसाल्यांच्या पदार्थांमध्ये पाचक गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळून येतात. ओव्यामध्ये असलेले घटक पोटातील पाचक रसायन सक्रिय करतात. यामुळे गॅस आणि अपचन होत नाही. शरीरातील मेटाबॉलिझ्म वाढवण्यासाठी आणि पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी नियमित जिरं आणि ओव्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमधील घाण सहज बाहेर पडून जाईल.
ओवा जिऱ्याचे पाणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा जिरं आणि ओवा मिक्स करून उकळवण्यासाठी ठेवावे. त्यानंतर पाण्याला उकळी येऊन पाणी अर्धा झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेले पाणी गाळून उपाशी पोटी सेवन करावे. याशिवाय जिरं आणि ओव्याची पावडर कोमट पाण्यात मिक्स करून नियमित प्यायल्यास महिनाभरात फरक दिसून येईल. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळेल आणि पचनसंस्था कायमच सक्रिय राहील. वारंवार पोट फुगण्याची समस्या उद्भवत असेल तर जिरा आणि ओव्याचे पाणी प्यावे.
कोबीतील किड्यामुळे 18 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, कसा घुसतो मेंदूत किडा; कसे स्वतःला वाचवाल
सकाळी उठल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून गेल्यास संपूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाने जातो. त्यामुळे आहारात कायमच जास्त फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटाला आराम मिळतो. आतड्यांमध्ये आणि शरीरात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. आहारात मेथी, पालक, तांदूळ, पेरू, पपई, सफरचंद आणि संत्री, गव्हाचे पीठ, ओट्स, बाजरी किंवा नाचणी इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. फायबर असलेले पदार्थ शरीरातील घाण बाहेर काढून टाकतात आणि शरीर स्वच्छ ठेवतात.
Ans: बद्धकोष्ठता म्हणजे आतड्याची हालचाल कमी होणे, शौचास कठीण आणि कमी प्रमाणात होणे, आणि पोट साफ न झाल्यासारखे वाटणे.
Ans: पोटातील ऍसिड अन्ननलिकेत परत आल्याने छातीत जळजळ होते.
Ans: चुकीच्या खाण्याच्या सवयी, मसालेदार/तेलकट अन्न.






