
पचनक्रिया राहील कायमच निरोगी! 'या' पदार्थांचा वापर करून बनवा हेल्दी डिटॉक्स ड्रिंक
डिटॉक्स पेय बनवण्याची कृती?
डिटॉक्स पेय प्यायल्यामुळे शरीराला होणारे फायदे?
त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी घरगुती उपाय?
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीराची पचनक्रिया कायमच सक्रिय आणि मजबूत असणे आवश्यक आहे. कारण दिवसभरात खाल्ले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यास संपूर्ण शरीराला हानी पोहचते. चुकीच्या वेळी जेवणे, सतत जंक फूड खाणे, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव इत्यादी अनेक कारणामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. यामुळे ऍसिडिटी, अपचन, गॅस किंवा वर्णवर पोटात वेदना होऊ लागतात. बिघडलेल्या पचनक्रियामुळे बद्धकोष्ठता, अपचन, गॅस इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमध्ये तशीच साचून राहते, ज्यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे नेहमीच शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स ठेवणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांचा वापर करून डिटॉक्स ड्रिंक तयार करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. याशिवाय संपूर्ण दिवसभर सुद्धा तुम्ही डिटॉक्स पेय पिऊ शकता. डिटॉक्स पेय प्यायल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात. डिटॉक्स पेय बनवण्यासाठी वेगवेगळ्या फळांचा आणि बियांचा वापर केला जातो. नैसर्गिक औषधी वनस्पती, फळे किंवा बियांचे अर्क मिक्स झाल्यानंतर तयार केलेल्या पेयाची चव अतिशय सुंदर लागते. शरीर ताजेतवाने ठेवण्यासाठी डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. तुळस, सब्जा, पुदिना, लिंबू, दालचिनी, आले इत्यादी पदार्थांचा वापर करून तुम्ही डिटॉक्स पेय बनवू शकता. डिटॉक्स पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात लिंबाचे तुकडे, आल्याचे तुकडे, काळे मीठ टाकून रात्रभर पाणी तसेच ठेवून द्या. त्यानंतर तयार केलेले पेय सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल.
तुळशीच्या बियांमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स आणि दाहशामक घटक शरीरात वाढलेला तणाव कमी करण्यासाठी मदत करतात. याशिवाय पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करावे. शरीरात वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी चिया सीड्स आणि इतर घटक मदत करतात. नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते, पोटफुगी कमी होते आणि पोटात जडपणा जाणवत नाही. याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही डिटॉक्स पेयांचे सेवन करू शकता.
डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीरातील क्षार संतुलन सुधारते. नैसर्गिकरित्या शरीर शुद्ध करण्यासाठी डिटॉक्स पेय अतिशय प्रभावी आहे. लिंबामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते. याशिवाय शरीरात वाढलेली उष्णता कमी होऊन पोटाला थंडावा मिळतो. शरीरातील पेशी सक्रिय करण्यासाठी आणि स्वच्छ हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. त्वचेवर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग कमी करण्यासाठी लिंबाचा वापर करून बनवलेले डिटॉक्स पेय नियमित प्यायल्यास महिनाभरात चेहरा अतिशय उजळदार आणि सुंदर दिसेल.
Ans: डिटॉक्स वॉटर म्हणजे फळे, भाज्या आणि औषधी वनस्पती जसे की काकडी, लिंबू, पुदिना इत्यादी पाण्यात टाकून तयार केलेले आरोग्यदायी पेय.
Ans: रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
Ans: डिटॉक्स वॉटर पिण्याचे कोणतेही मोठे तोटे नाहीत, परंतु कोणत्याही आरोग्यविषयक समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.