हिरड्यांना सूज येऊन वारंवार रक्त येतं? मग एम्स डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' नक्की करून पहा
दातांच्या समस्या कोणत्या कारणांमुळे वाढतात?
दात स्वच्छ करण्यासाठी उपाय?
हिरड्यांमधून वारंवार रक्त का येते?
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दातांच्या काहींना काही समस्या उद्भवत असतात. कधी दात दुखणे तर कधी दातांमधून रक्त येणे. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. हिरड्यांमध्ये रक्तस्त्राव, सूज, हिरड्यांमध्ये वाढलेल्या वेदना, सतत दुर्गंधी येणे, दातांमधील वाढलेले अंतर, चघळताना वेदना, दात सैल होणे, हिरड्यांमध्ये पू किंवा थंड पदार्थांचे सेवन केल्यानंतर संवेदना जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. हिरड्यांसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर अतिशय स्पष्ट लक्षणे दिसून येतात. कामाच्या धावपळीमध्ये दातांच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही.(फोटो सौजन्य – istock)
भारतामध्ये सुमारे ५० टक्के लोक दात आणि हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहेत. हिरड्यांच्या आजाराची लागण झाल्यानंतर सुरुवातीला अतिशय सौम्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने या लक्षणांमध्ये वाढ होत जाते. दातांभोवती असलेल्या ऊतींचा संसर्ग वाढू लागल्यानंतर अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरड्यांना आलेली सूज आणि दातांमधून वारंवार रक्त येणे इत्यादी दातांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नवी दिल्लीतील एम्स डॉक्टरांनी सांगितलेले काही प्रभावी उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास दात आणि हिरड्यांच्या संसर्गापासून कायमची सुटका मिळेल.
नियमित खाल्लेले अन्नपदार्थांचे कण दातांमध्ये तसेच चिटकून राहतात. त्यामुळे दातांवर हळूहळू प्लेक नावाचा एक चिकट, बॅक्टेरियाचा थर जमा होतो. नियमितपणे ब्रश आणि फ्लॉस योग्यरित्या न केल्यामुळे दातांच्या भोवती चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. जमा झालेला प्लेक टार्टरमध्ये घट्ट होऊन बसतो, जो काढणे सुद्धा अतिशय कठीण आहे. दातांच्या आजारांची लक्षणे शरीरात दिसू लागल्यानंतर वेळीच उपचार करावे. हिरड्यांमधून रक्त येणे, वेदना किंवा सूज येणे, तोंडाची दुर्गंधी येणे, दात सैल होणे, दात आणि हिरड्यांमधील वाढणारी अंतर इत्यादी लक्षणे दिसू लागतात.
नेहमीच दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दात स्वच्छ न केल्यामुळे हिरड्या आणि दात खराब होऊन जातात. दिवसभरात दोनदा किंवा तीनदा टूथपेस्टचा वापर करून ब्रश करावा. तसेच दातांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मिठाचा वापर करावा. मिठाच्या वापरामुळे दात स्वच्छ होण्यासोबतच हिरड्यांच्या वेदनांपासून सुद्धा आराम मिळतो. दातांवर जमा झालेला प्लेक काढण्यासाठी स्केलिंग करणे आवश्यक आहे.
Ans: दिवसातून दोनदा, सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे आवश्यक आहे.
Ans: चॉकलेट, कँडी आणि इतर गोड पदार्थ कमी खा
Ans: दूध, दही आणि चीज यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा.






