स्क्रिनटाईममुळे डोळ्यांना गंभीर त्रास (फोटो सौजन्य - iStock)
हल्लीच्या डिजीटल युगात मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट आणि टीव्ही या स्क्रिन्स आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग ठरत आहेत. काम असो, शिक्षण असो वा मनोरंजन, प्रत्येक गोष्ट आता स्क्रीनशी जोडली गेली आहे. मात्र या सततच्या डिजिटल संपर्काचा आपल्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचे डॉक्टर सांगतात. डॉ. उपासना गर्ग, रिजनल टेक्निकल चीफ, अपोलो डायग्नोस्टिक्स, मुंबई यांच्याकडून अधिक माहिती आपण घेऊया.
लहानांपासून ते प्रौढांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तीचा स्क्रिन टाईम वाढत आहे. वाढलेला स्क्रीन टाईम डोळ्यांवर परिणाम करू शकतो. वाढलेला स्क्रीन टाईम हा सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रभावित करतो. यामुळे डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणे, कोरडेपणा आणि अंधुक दृष्टीसारख्या गंभीर दृष्टी समस्यांचा धोका वाढतो.
नक्की काय आहे धोका?
डिजीटल आय स्ट्रेन ही एक सामान्य घटना आहे यामुळे सतत स्क्रिनकडे पाहिल्यास थकवा येतो, दृष्टी अंधुक होते आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. स्क्रिनचा वाढता वापर हा डोळ्यांचा कोरडेपणा, खाज सुटणे आणि डोळ्यांची जळजळ होणे अशा समस्या निर्माण करतील. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा वापर मर्यादित करणे गरजेचे आहे.
वाढता स्क्रिन टाईम, ब्ल्यू लाईट हा झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकतो. यामुळे रात्रीची शांत झोप मिळणे कठीण होते. मुलांमध्ये जास्त स्क्रीन एक्सपोजरमुळे मायोपियाची समस्या सतावते (जवळपासची दृष्टी). यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दर 30 मिनिटांनी ब्रेक घेणे आवश्यक आहे, डोळ्यांवरील ताण कमी करण्यासाठी अंधाऱ्या खोलीमध्ये स्क्रीनचा वापर करणे टाळा, वारंवार डोळे मिचकावा आणि स्क्रीनचा वापर अपरिहार्य असल्यास संरक्षक फिल्टर किंवा चष्मा वापरा. वर्षातून एकदा डोळ्यांच्या तपासणीमुळे डोळ्यांच्या समस्या वेळीच ओळखण्यास मदत होते.
कोणत्या वयामध्ये किती स्क्रीनटाईम योग्य? चुकून पण करू नका ‘ही’ चूक
दुर्लक्ष करणं ठरेल त्रासदायक
डिजीटल स्क्रिनच्या वाढत्या वापरामुळे ताण, कोरडेपणा आणि अंधुक दृष्टी यासारख्या डोळ्यांच्या समस्या सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये सामान्यपणे आढळून येत आहेत. मोठ्या संख्येने लोकं डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात जोपर्यंत या समस्या गंभीर रुप धारण करत नाहीत किंवा दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणत नाहीत तोपर्यंत या समस्यांकडे गांभीर्याने पाहिजे जात नाही. नियमित डोळ्यांची तपासणी करणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे दृष्टीतील बदल, स्क्रिनशी संबंधित समस्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखण्यास मदत होते.
प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा किंवा जर सतत डोकेदुखी, डोळे दुखणे किंवा लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असेल तर त्वरीत डोळ्यांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. ज्यांना आधीच डोळ्यांची समस्या आहे त्यांनी दर 6 महिन्यांनी डोळे तपासणी करावी. डोळे हे आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव असून त्यासंबंधी समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय रडारड, चिडचिडेपणाची समस्या; पालकांनी वेळीच घाला आवर