फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळामध्ये प्रत्येक जण व्यसनी आहे. कुणाला मद्याचे व्यसन आहे तर कुणाला ध्रुम्रपानाचे व्यसन आहे. परंतु, जे लोकं या गोष्टीपासून लांब असतात त्यांनी स्वतःला निर्व्यसनी मुळीच म्हणून नाही. व्यसन फक्त नशेच्या गोष्टींचे नसते, कुणाला कलेचे असते, कुणाला कुण्या व्यक्तीचे असते. व्यसनाशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. ध्येयाचे व्यसन असेल तरच ध्येयप्राप्ती होईल, अन्यथा ध्येय आणि तुमच्यामध्ये कोणतेही नाते उरत नाही. व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी वेडे होणे. त्या गोष्टीशिवाय आपले आयुष्य अपूर्ण वाटणे, याला व्यसन म्हणतात.
हे देखील वाचा : महामारीप्रमाणे पसरतोय लठ्ठपणा, 2030 पर्यंत 100 कोटी लोकं होतील लठ्ठ! अनेकांचा जाऊ शकतो जीव
आजच्या जगामध्ये ती जागा मोबाईल फोनने घेतली आहे. मोबाईल फोनचे व्यसन लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत इतके वाढले आहे कि मोबाईल फोनशिवाय लोकांना आयुष्य जगणे जड जात आहे. काही मिनिटे मोबाईल फोनपासून दूर राहणे खूप कठीण झाले आहे. काही लोकं कामाच्या निमित्ताने तर काही लोकं वेळ घालवण्याच्या हेतूने मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबसारख्या गोष्टींचा अतिवापर करतात. अशा गोष्टींचा अतिवापर करणे म्हणजे एकप्रकारे ‘आ बैल मुझे मार!’ करणे.
अशा गोष्टींनी डोळ्यांचे विकार तर होतातच त्याबरोबर अनेक आरोग्याचे समस्या उद्भवतात. त्यामुळे वाढलेला स्क्रिनटाईम कमी करणे, हाच उद्देश प्रत्येकाने ठेवले पाहिजे. मुळात, जन्मजात बाळापासून अशी उपकरणे फक्त चार हात नव्हे तर किमान दहा हात दूरवर ठेवले पाहिजे. त्या उपकारांची रेडिएशन बाळांसाठी घटक ठरू शकते. ३ वर्षे ते ५ वर्षे वयोगटातील बाळांपासूनदेखिल अशी उपकरणे लांब ठेवावीत. विरंगुळ्यासाठी अशी उपकरणे देण्यापेक्षा त्यांना कला आणि मैदानी खेळ शिकवा.
हे देखील वाचा : धक्कादायक! शारीरिक संबंधांदरम्यान ब्लिडिंगकडे करू नका दुर्लक्ष, चुकीमुळे गेला मुलीचा जीव
दरम्यान, ६ ते १२ वर्षे वयोगातील मुले प्रारंभिक शिक्षण घेत असतात. अशा वेळी त्यांना कामासाठी का होईना, या उपकरणांची गरज भासते. अशा वेळी त्यांना कामासाठी जास्तीत जास्त दीड ते दोन तास अशा उपकरणांचा सहवास द्यावा तसेच मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करावे. १३ ते १८ वर्षे वय म्हणजे किशोरवयाचे वय. या वयामध्ये मुले समजूतदार होण्यास सुरु होतात. या वयात मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे तसेच त्यांना जास्तीत जास्त ३ तास स्क्रिनटाईमसाठी परवानगी द्यावी. प्रौढ व्यक्तींना जरी कामासाठी स्क्रीन टाइम घ्यावा लागत असला आणि जरी ते अनिवार्य असले तरी त्यामध्ये काही मर्यादा ठेवाव्यात. आपल्या आरोग्याची काळजी घेता काम करावे. वयोवृद्धांनी स्क्रिनटाईम शक्यतो टाळावे.