स्क्रिन टाइम वाढल्याने काय होतोय मुलांवर परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
हल्ली लहान मुलांमधील स्क्रिन टाईम वाढत आहे. धक्कादायक म्हणजे या साऱ्याचा त्यांचा मूड, झोप आणि भाषेच्या विकासावर परिणाम होत आहे. म्हणूनच, पालकांनी स्क्रिन टाईम कमी करणे ही काळाची गरज आहे. डॉ. प्रशांत लक्ष्मणराव रामटेककर, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, लुल्लानगर, पुणे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
आजच्या डिजीटल युगात स्क्रिन टाईम वाढला असून टीव्ही, टॅब्लेट, फोन आणि डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेली खेळण्यांचा वापर वाढला आहे. अनेक पालकांसाठी ही उपकरणे मस्तीखोर मुलांना शांत करण्यासाठी तसेच त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात . परंतु जास्त स्क्रीन एक्सपोजरचे दीर्घकालीन परिणाम समजून घेणे आवश्यक आहे.
काय होतो परिणाम
जास्त स्क्रिन टाइम आता लहान मुलांमध्ये वारंवार मूड स्विंग्ज, उशिरा बोलणे, झोपेसंबंधी समस्या आणि समाजापासून दूर पळणे अशा समस्यांना कारणीभूत ठरते. मूल वाढत असताना निरुपद्रवी वाटणारे मनोरंजन हा चिंतेचा विषय बनू शकते. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २ वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीनपासून पूर्णपणे दूर ठेवणे आणि २-५ वयोगटातील मुलांचा स्क्रिनटाईम दिवसातून १ तासापेक्षा जास्त नसावा.
कोणत्या वयामध्ये किती स्क्रीनटाईम योग्य? चुकून पण करू नका ‘ही’ चूक
लहान मुलांवर होणारा डिजिटलाझेशनचा परिणाम–
विविध अभ्यासांनुसार, स्क्रिनसमोर दिवसातून एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त वेळ घालवणाऱ्या लहान मुलांना पुढील गोष्टींचा सामना करावा लागू शकतो:
‘स्क्रीन टाइम’ वाढल्याने ‘Brainfog’चा धोका!
लक्षणे कोणती
अनेक पालकांना हे कळत नाही की सतत अस्वस्थ वाटणे, झोप न लागोने असणे किंवा स्क्रीन टाइमनंतर चिडचिडेपणा वाढणे यासारखी लक्षणे दिसून येतात. स्क्रीनचा वापर हा मुलांना शांत करण्यासाठी किंवा कौतुकासाठी केला जात असल्याने, मुलं बहुतेकदा डिजिटल डिव्हाइसवरच अवलंबून राहणे पसंद करतात.
लहान मुलांमध्ये स्क्रीन टाइम व्यवस्थापित करण्यासाठी टिप्स: