सध्या फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आपल्या हातात सतत फोन असतो. कॉलिंग, चॅटिंग, मॅसेजिंग, सोशल मिडीया वापरणं, सिनेमा बघणं, या सगळ्यासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. पण स्मार्टफोनच्या सततच्या वापराणे आपल्या डोळ्यांना त्रास सुरु होतो. आपले डोळे दुखु लागतात, डोळे लाल होतात, डोळ्यांमधून पाणी येतं. या समस्यांमुळे आपण काहीवेळ स्मार्टफोनचा वापर करणं थांबवतो. स्मार्टफोनचा वापर थांबवण हा या समस्येवरचा उपाय नाही. (फोटो सौजन्य - pinterest)
सतत फोनचा वापर केल्याने डोळे दुखतायत? टेंशन विसरा आणि आत्ताच करा ही सेंटिंग
स्मार्टफोनच्या वापरामुळे आपल्या डोळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. या समस्येवर आता आयफोनचं एक फीचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आयफोनमध्ये स्क्रीन डिस्टन्स फीचर देण्यात आलं आहे. नावाप्रमाणेच, हे वैशिष्ट्य स्क्रीन आणि डोळे यांच्यातील अंतर राखते.
आपण घरबसल्या स्मार्टफोनवर रिल्स पाहतो. चित्रपट पाहण्याव्यतिरिक्त प्रत्येक काम स्मार्टफोनवर केले जात आहे. सततच्या स्मार्टफोनच्या वापरामुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो. काही लोकांना फोन जवळून पाहण्याची सवय असते, जी खूप धोकादायक ठरू शकते. हे टाळण्यासाठी आयफोनने एक फीचर दिले आहे.
आयफोनचे स्क्रीन डिस्टन्स फीचर प्रत्येक युजरसाठी फायदेशीर ठरू शकते. या फीचरमध्ये तुम्ही जवळून फोन पाहिला तर तुमची स्क्रीन लॉक होईल. तुम्ही फोन दूर नेला तर फोन डिस्प्ले पुन्हा चालू होईल. फोनची स्क्रीन 12 इंच म्हणजेच डोळ्यांपासून 30 सेमी अंतरावर ठेवणं गरजेचं असतं. यामुळे तुमच्या डोळ्यांवर कमी ताण येतो.
सर्वप्रथम तुम्हाला आयफोनच्या सेटिंग्ज ऑप्शनवर जा. येथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. या पर्यायांपैकी, तुम्हाला स्क्रीन टाइम पर्यायावर टॅप करा. यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला स्क्रीन डिस्टन्स पर्यायावर टॅप करा. यानंतर Screen Distance हा पर्याय सक्षम करा. अशा प्रकारे तुमचे स्क्रीन डिस्टन्स फीचर चालू होईल.
तुम्हाला हे वैशिष्ट्य बंद करायचे असल्यास, तुम्हाला याच स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. बरेचदा असे दिसून आले आहे की बरेचदा लोक हे फीचर बंद करतात कारण जेव्हा ते चित्रपट किंवा सोशल मीडियावर बारकाईने स्क्रोल करतात तेव्हा स्क्रीन लॉक होते.
युजर्सच्या डोळ्यांच्या सुरक्षा लक्षात घेत आयफोनने स्क्रीन डिस्टन्स फीचर लाँच केलं आहे. अँड्रॉईड फोन्समध्ये स्क्रीन डिस्टन्स फीचर ईनबिल्ड नसलं, तरी देखील तुम्ही इतर अॅप्स डाऊनलोड करून हे फीचर तुमच्या फोनसाठी वापरू शकता. अँड्रॉईड युजर्स EyeGuard: Screen distance keep हे अॅप वापरू शकतात.