
आतड्यांमध्ये घाण तशीच साचून राहते? पोट स्वच्छ करण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेला 'हा' उपाय नक्की करा
हल्ली लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. दैनंदिन आहारात जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे . बिघडलेल्या पचनक्रियेचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लगेच दिसून येतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे पोटात वेदना होणे, बद्धकोष्ठता, आतड्यांमध्ये वेदना, ऍसिडिटी, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी एरंडेल तेल अतिशय प्रभावी ठरते. अध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांनी याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून गेले नाहीतर संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन आरोग्य बिघडते. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून गेल्यानंतर शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्यासंबंधित सर्वच समस्यांपासून आराम मिळतो. एरंडेल तेल रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट पाण्यात किंवा कोमट दूध मिक्स करून प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल आणि संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल. पोट व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी आणि लिम्फॅटीक सिस्टीमसुद्धा एक्टिव्ह करण्यासाठी पोट स्वच्छ असणे आवश्यक आहे. शरीरात वाढलेला सुस्तपणा कमी करण्यासाठी चमचाभर एरंडेल तेलाचे सेवन करावे.
वनस्ती तेल म्हणून एरंडेल तेल ओळखले जाते. एरंडीच्या शेंगा, रिकिनस कम्युनिस नावाच्या रोपाच्या बियांमधून तेल काढले जाते. या बियांमधून 40 ते 60 टक्के तेल निघते. यामध्ये असलेल्या पिवळ्या पदार्थाची चव आणि सुगंध अतिशय वेगळाच असतो. शरीरात साचून राहिलेला विषारी मल बाहेर काढून टाकण्यासाठी एरंडेल तेल अतिशय गुणकारी ठरते. यामुळे आतड्यांची सफाई होते आणि शरीराला अनेक फायदे होतात. गॅस, ब्लॉटींगच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी एरंडेल तेल प्रभावी ठरते.
सद्गुरूंनी सांगितल्यानुसार,एरंडेल तेल रात्रीच्या वेळी दूध किंवा पाण्यासोबत प्यावे. तसेच जेवणाआधी सुद्धा तुम्ही एरंडेल तेलाचे सेवन करू शकता. एरंडेल तेल पचनासाठी अतिशय जड असते. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराला हानी पोहचून संपूर्ण आरोग्य बिघडते. वारंवार पचनक्रिया बिघडू लागल्यास एरंडेल तेलासोबतच तुम्ही इतर डिटॉक्स पेयांचे सेवन करू शकता. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.
Ans: फायबरयुक्त पदार्थ कमी खाणे.पुरेसे पाणी न पिणे.दिनचर्या किंवा खाण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल.
Ans: दिवसभर पुरेसे पाणी प्या. कोमट पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.
Ans: बद्धकोष्ठता म्हणजे शौचास त्रास होणे किंवा आतड्यांची हालचाल क्वचितच होणे.