Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा ‘या’ सोनेरी पाण्याचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी जिरं, बडीशेप आणि ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारून चेहऱ्यावर ग्लो येतो. जाणून घ्या डिटॉक्स पेय बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2025 | 08:40 AM
आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा 'या' सोनेरी पाण्याचे सेवन

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा 'या' सोनेरी पाण्याचे सेवन

Follow Us
Follow Us:

रोजच्या आहारात खाल्लेल्या सर्वच पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. यामुळे ऍसिडिटी, गॅस किंवा शरीरात विषारी घटक साचून राहण्याची शक्यता असते. शरीरात दिसून येणाऱ्या बदलांकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आतड्यांमध्ये चिकटून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोट व्यवस्थित स्वच्छ होत नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, मुरूम किंवा डाग वाढू लागतात. तसेच चेहरा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जातो. चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि काळवंडलेली वाटू लागते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यानंतर बाजारातील स्किन केअरचा वापर केला जातो.(फोटो सौजन्य – istock)

लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाणेरडी चरबी स्वच्छ करण्यासाठी ‘या’ पदार्थाचा आहारात करा समावेश, कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

शरीरात साचून राहिलेल्या घाणीचा आणि विषारी वायूचा परिणाम थेट चेहऱ्यावर होतो, ज्यामुळे पिंपल्स, मुरूम किंवा काळे डाग वाढू लागतात. त्यामुळे आहारात बदल करून सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याशिवाय शरीर स्वच्छ करण्यासाठी नियमित डिटॉक्स पेयांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेला विषारी वायू आणि विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी कोणत्या पाण्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पाण्याचे महिनाभर नियमित सेवन केल्यास सकारात्मक फरक दिसून येईल.

डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची कृती:

  • बडीशेप
  • जिरं
  • ओवा
  • काळे मीठ
  • पाणी
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात जिरं, ओवा आणि बडीशेप घालून १० मिनिटं पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. यामुळे पदार्थांमधील अर्क पाण्यात उतरेल. त्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेल्या पाण्याचे सेवन करा. डिटॉक्स पेयांचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स, मुरूम आणि काळे डाग कमी होऊन चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. याशिवाय शरीरात साचून राहिलेली विषारी घाण बाहेर काढून टाकण्यासाठी हेल्दी पेयांचे सेवन करावे. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक वाढवण्यासाठी बडीशेप, जिऱ्याचे पाणी प्यावे.

बडीशेपचे फायदे:

जेवणानंतर सगळ्यांचं बडीशेप खाण्याची सवय असते. यामुळे खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. बडीशेप त्वचेसाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात. त्वचा नैसर्गिकरित्या ताजीतवानी ठेवण्यासाठी बडीशेप किंवा बडीशेपचे पाणी प्यावे.

वय वाढल्यानंतर शरीरासाठी घातक ठरतात ‘ही’ फळे! आतड्यांमध्ये तयार होईल विष, सांध्यांमध्ये वाढेल युरिक अ‍ॅसिड

जिर्‍याचे फायदे:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना जिऱ्याचा वापर केला जातो. जिऱ्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे जेवणाला फोडणी देताना जिऱ्याचा भरपूर वापर केला जातो. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे रक्त शुद्ध होते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. चेहऱ्यावर चमक वाढवण्यासाठी नियमित जिरं, बडीशेप आणि ओव्याचे पाण्याचे न चुकता सेवन करावे.

FAQs (संबंधित प्रश्न)

त्वचेची काळजी घेण्यासाठी मुख्य टिप्स:

दिवसातून २-३ वेळा चेहरा धुवा, कारण यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल निघून जाते. उन्हाळ्यात त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

सामान्य त्वचा रोग आणि त्यांची लक्षणे?

जेव्हा त्वचेची छिद्रे तेल, बॅक्टेरिया आणि मृत त्वचेमुळे ब्लॉक होतात तेव्हा मुरुम येतात.एक्झिमा झाल्यानंतर त्वचा कोरडी होते आणि खाज सुटते, त्यामुळे सूज, क्रॅक किंवा खवले येऊ शकतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dirt stuck in the intestines will be clean in an instant consume this golden water at night before sleeping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 08:40 AM

Topics:  

  • detox drinks
  • glowing face
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं
1

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम
2

Health Tips: लो बीपीमुळे त्रस्त आहात? आहारात समाविष्ट करा ‘हे’ पदार्थ, मिळेल आराम

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम
3

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मग कपाळावर लावा सुंठाचा ‘या’ पद्धतीने लेप, पारंपरिक उपाय करून वेदनांपासून मिळेल आराम

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे
4

Liver Cancer: शरीरात ‘ही’ ५ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध; असू शकतं लिव्हर कॅन्सरचं संकेत, अशी ओळखा लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.