आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! दह्यात मिक्स करून 'ही' गुणकारी पावडर
धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येक व्यक्तीला पचनासंबंधित समस्या कायमच उद्भवत असतात. आहारात सतत जंक फूड, तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्यामुळे पोटात गॅस तयार होऊन पचनक्रिया बिघडते.पचनसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. शरीरात विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आतड्यांमध्ये घाण तशीच चिटकून राहते. आतड्यांमध्ये चिटकून राहिलेल्या घाणीमुळे पोटात दुखणे किंवा आतड्यांना हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी दह्यात कोणता पदार्थ मिक्स करून खावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थाच्या नियमित सेवनामुळे शरीर स्वच्छ होईल आणि पचनाच्या कोणत्याही समस्या उद्भवणार नाही.(फोटो सौजन्य – istock)
नियमित वाटीभर दह्यात अळशीच्या बियांची पावडर मिक्स करून खाल्यास आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. दह्यामध्ये असलेले घटक शरीरात वाढलेली उष्णता कमी करून शरीर कायमच हायड्रेट ठेवण्यास मदत करते. दही आणि अळशीच्या बियांच्या पावडरचे सेवन केल्यास पचनसंस्था सुधारेल आणि शरीरात साचलेले मल बाहेर पडून जाईल. आतड्यांच्या हालचाली सुलभ करण्यासाठी दही आणि अळशीच्या बियांची पावडर खावी.
अळशीच्या बियांचे शरीराला असंख्य फायदे होतात. या बियांमध्ये असलेले घटक शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. अळशीच्या बियांमध्ये विद्राव्य तंतूंचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आतड्यांमधील मलाची हालचाली सुरळीत राहते. याशिवाय अळशीच्या बियांची पावडर बनवून नियमित सेवन केल्यास पोट फुगणे किंवा पोटाच्या कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक पचनाच्या समस्यांपासून आराम मिळवून देतात.
मुंबईमध्ये वाढतोय मेंदूच्या संसर्गजन्य आजाराचा धोका, पावसाळ्यात ‘या’ पद्धतीने घ्या आरोग्याची काळजी
पचनक्रिया कायमच निरोगी ठेवण्यासाठी आहारात शरीरास सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारात भरपूर पाणी, थंड पदार्थ, फळे भाज्या आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर अर्धा तास व्यायाम, ध्यान किंवा योगासने केल्यास कायमच शरीरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहील.
पचन म्हणजे काय?
पचन म्हणजे अन्नाचे मोठ्या रेणूंचे लहान, पाण्यात विरघळणाऱ्या रेणू मध्ये रूपांतरण करणे.
पचनाच्या मुख्य पायऱ्या कोणत्या आहेत?
पचनाच्या मुख्य पायऱ्यांमध्ये अन्न खाणे, ते चावणे, अन्ननलिकेद्वारे पोटात जाणे, रासायनिक आणि शारीरिक प्रक्रियेद्वारे अन्न खंडित करणे आणि पोषक तत्वांचे रक्तामध्ये शोषण करणे यांचा समावेश होतो.
पचनाच्या समस्या काय आहेत?
अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार, छातीत जळजळ यासारख्या समस्या पचनाच्या समस्या आहेत.