मुंबईमध्ये वाढतोय मेंदूच्या संसर्गजन्य आजाराचा धोका
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तसेच या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. सर्दी, खोकला, ताप, जुलाब इत्यादी आजार झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. ज्यामुळे वारंवार शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. तसेच मुंबईमध्ये टेपवर्कच्या संसर्गजन्य आजाराची लागण अनेकांना होत आहे. मेंदूसंबंधित आजार झाल्यानंतर संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. मुंबईमध्ये मेंदूसंबंधित आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वारंवार खाल्ल्या जाणाऱ्या दूषित अन्नपदार्थांमुळे आणि पाण्याद्वारे टेपवर्मची अंडी शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात त्वचा आणि आरोग्यासंबंधित आजार मोठ्या प्रमाणावर पसरतात. ज्यामुळे इन्फेक्शन वाढते आणि शरीराला हानी पोहचते. पावसाळ्यात कमी शिजवलेले मासे, चिकन किंवा स्वच्छ न घेतलेल्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे टेपवर्क अळ्या शरीरात प्रवेश करतात. हे पदार्थ खाल्ल्यानंतर टेपवर्क अळ्या शरीरातून मेंदूमध्ये प्रवेश करतात. ज्यामुळे सिस्ट विकसित होऊन डोक्यामध्ये तीव्र सनक जाणे, वारंवार डोकं दुखी किंवा मेंदूसंबंधित आजारांचा धोका वाढू लागतो.
लहान मुलांच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती अतिशय कमी असते. ज्यामुळे लहान मुलं सतत आजारी पडू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांची खूप जास्त काळजी घ्यावी. सतत वाढलेली डोकेदुखी आणि वारंवार येणाऱ्या झटक्यांकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. न्यूरोसिस्टिकोसिस हा मध्यवर्ती मज्जासंस्थेचा प्रतिबंध परजीवीला होणारा संसर्ग आहे. डुकराचे मांस टेपवर्म टेनिया सोलियमच्या लाव्हामुळे मानवी मेंदूमध्ये तयार होतो.
रोजच्या आहारात अनेक लोक कमी शिजलेले डुकराचे मास, दूषित पाणी किंवा अस्वच्छतेमुळे टेपवर्मच्या अंड्यांच्या संपर्कात येतात. हा संसर्ग सगळीकडे पसरू लागल्यानंतर अन्नपदार्थ आणि दूषित पाण्यातून शरीरात प्रवेश करतो. ज्यामुळे सुरुवातीच्या काळात आतड्यांसंबंधीत संसर्ग होऊन आरोग्य बिघडते. हा आजार झाल्यानंतर योग्य वेळी उपचार न केल्यामुळे शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. शरीरात प्रवेश केलेल्या अळ्या स्नायू, त्वचा, डोळे आणि मेंदूच्या पेशींवर परिणाम करतात. हळूहळू या अळ्या मेंदूमध्ये साचून राहतात, ज्यामुळे काहीवेळा मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन, गरम पाणी आणि अंतर्गत स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.
टेपवर्म इन्फेक्शन म्हणजे काय?
टेपवर्म इन्फेक्शन, ज्याला टेनियासिस (Taeniasis) देखील म्हणतात, जेव्हा काही प्रकारचे टेपवर्म तुमच्या आतड्यात प्रवेश करतात तेव्हा होते.
टेपवर्म इन्फेक्शन कसे होते?
टेपवर्म इन्फेक्शन प्रामुख्याने दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरते. कच्चे किंवा अपूर्ण शिजवलेले मांस (जसे की डुक्कर, गाय किंवा मासे) खाल्ल्याने किंवा दूषित माती, पाणी किंवा मल यांच्या संपर्कात आल्याने टेपवर्म इन्फेक्शन होऊ शकते.
टेपवर्म इन्फेक्शनची लक्षणे काय आहेत?
पोटाच्या वरच्या भागात दुखणे, वेदना, किंवा अस्वस्थता, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा जास्त भूक लागणे, मळमळ किंवा उलट्या, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, अशक्तपणा किंवा थकवा, वजन कमी होणे किंवा भूक न लागणे.