Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Tips: भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

Kitchen Utensils Wash Sponge: तुम्ही देखील भांडी घासण्यासाठी महिनोमहिने एकच स्पंज वापरताय, मग आताच थांबा, याचे आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम होतात, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 16, 2026 | 07:49 PM
Health Tips:  भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा? किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
Follow Us
Follow Us:
  • भांडी चमकदार, पण स्पंज घाणेरडा?
  • किचनमधील ‘ही’ चूक आरोग्यासाठी ठरेल धोकादायक
  • स्पंज कधी बदलावा?
किचनमध्ये वापरला जाणारा स्पंज ही एक लहान गोष्ट वाटू शकते, पण तुमच्या किचनच्या स्वच्छतेमध्ये आणि आरोग्यामध्ये हा स्पंज मोठी भूमिका बजावतो. स्पंजचा वापर दररोज भांडी धुण्यासाठी, किचन स्लॅब स्वच्छ करण्यासाठी, तेल आणि अन्नाचे डाग काढण्यासाठी केला जातो. यामुळे तो सतत पाणी, तेलकटपणा, साबण आणि अन्नाच्या लहान कणांच्या संपर्कात येतो. सतत ओला राहिल्यामुळे स्पंजमध्ये बॅक्टेरिया खूप लवकर वाढू लागतात. बरेच लोक महिनोन् महिने तोच स्पंज वापरत राहतात आणि त्यांना वाटते की साबणाने तो स्वच्छ होतो, परंतु, हे स्वच्छ करण्याऐवजी, जुना स्पंज घाण आणि जंतू पसरवू लागतो. हेच बॅक्टेरिया भांडी, ताटं आणि किचनमधील इतर वस्तूंवर पसरू शकतात. जर स्पंज वेळेवर बदलला नाही, तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक म्हणजे काय? याची लक्षणे कोणती?

स्पंज कधी बदलावा?

एक स्पंज साधारणपणे एक ते दोन आठवड्यांनी बदलणे उत्तम मानले जाते. जर तुमचे कुटुंब मोठे असेल, भांडी जास्त असतील किंवा स्पंज सतत ओला राहत असेल, तर तो अधिक वेळा बदलण्याची गरज भासू शकते. वारंवार वापरामुळे स्पंजवर घाण जमा होते. स्पंज सतत ओला राहिल्याने यामध्ये आतून बॅक्टेरिया जमा होतात.

स्पंजमधून दुर्गंध येणे

जर तुमच्या स्वयंपाकघरातील स्पंजला आंबट किंवा विचित्र वास येऊ लागला, तर याचा अर्थ यामध्ये बॅक्टेरिया जमा झाले आहे. बरेच लोक असे स्पंज फक्त धुऊन पुन्हा वापरतात, परंतु दुर्गंधीयुक्त स्पंज वापरणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. स्पंजमध्ये अडकलेले अन्नाचे लहान कण आणि सततचा ओलावा बॅक्टेरियाच्या वाढीस चालना देतात. यामुळेच तो ताबडतोब बदलला पाहिजे.

फाटलेला स्पंज

फाटलेला स्पंज जेव्हा स्पंज तुटू लागतो, त्याचा आकार बिघडतो किंवा तो मऊ पडून ठिसूळ होतो, तेव्हा तो भांडी घासण्यासाठी योग्य राहत नाही. असे स्पंज भांडी व्यवस्थित स्वच्छ करत नाहीत आणि इतर वस्तूंवर घाण पसरवू शकतात. म्हणून, स्पंज पूर्णपणे जीर्ण होईपर्यंत त्याचा वापर करू नका. तो वेळेवर बदला.

वेगवेगळ्या कामासाठी वेगळा स्पंज

जर तुम्हाला तुमचे किचन अधिक स्वच्छ ठेवायचे असेल, तर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे स्पंज वापरा. भांडी धुण्यासाठी वेगळा स्पंज, किचन काउंटर स्वच्छ करण्यासाठी एक वेगळा आणि जास्त घाण साफ करण्यासाठी एक वेगळा स्पंज. यामुळे एका भागातील घाण दुसऱ्या भागात पसरणार नाही.

स्पंज स्वच्छ आणि कोरडे ठेवा

स्पंज वापरल्यानंतर, ते पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि कोरड्या जागी ठेवा. स्पंज ओला राहिल्यास, त्यावर बॅक्टेरिया वेगाने वाढतात. बरेच लोक त्यांचे स्पंज सिंकच्या कोपऱ्यात ठेवतात, जिथे ते सतत ओले राहतात. यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात. वापरल्यानंतर ते पिळून घेण्याचा प्रयत्न करा आणि कोरड्या जागी ठेवा.

Curry Leaves: वेटलॉस ते ब्लड शुगर कंट्रोल; कढीपत्ता आरोग्यासाठी वरदान, वाचा अद्भुत फायदे

Web Title: Dirty kitchen sponge health risks and cleaning tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • kitchen tips
  • lifestyle news in marathi

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.