Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा ‘नारळाची गोडसर रबडी’

Coconut Rabdi Recipe : दिवाळीच्या सणानिमित्त काही गोड पदार्थाचा बेत करत असाल तर यंदा नारळाची रबडी घरी बनवून पहा. याची चव तुमच्या तोंडात टाकताच अशी विरघळेल की खाता क्षणीच तुम्ही या पदार्थाचे फॅन व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2025 | 10:35 AM
Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा 'नारळाची गोडसर रबडी'

Diwali 2025 : सणानिमित्त घरी पदार्थांचा गोडवा असायलाच हवा, यंदा घरी बनवून पहा 'नारळाची गोडसर रबडी'

Follow Us
Follow Us:

“भारतीय मिठायांमध्ये रबडीचा एक खास असा दर्जा आहे. ही पारंपारिक गोड डिश सण-उत्सव, पाहुणचार किंवा खास प्रसंगी बनवली जाते. पण आज आपण थोडं हटके आणि अधिक स्वादिष्ट व्हर्जन पाहणार आहोत. तुम्ही रबडी हा गोड पदार्थ अनेकदा खाल्ला असेल अशात आज आम्ही तुम्हाला नारळाची रबडी कशी तयार करायची ते सांगणार आहोत. दिवाळीच्या सणात घरी काही गोड बनवण्याचा विचार केला असेल तर ही डिश तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे.

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी पनीर जिलेबी, दिवाळीच्या आनंदात होईल आणखीनच वाढ

ताजी नारळाची चव, दुधाचा गोडवा आणि वेलदोड्याचा सुगंध यांचा सुंदर संगम या रबडीत आढळतो. नारळ रबडी ही केवळ खाणाऱ्यांची मनं जिंकत नाही, तर बनवायलाही अत्यंत सोपी आहे. ही मिठाई थंडगार सर्व्ह केल्यावर तिचा आनंद दुप्पट वाढतो. विशेष म्हणजे दिवाळी, गणेशोत्सव किंवा उन्हाळ्याच्या दिवसांतही ही रबडी उत्तम डेझर्ट ठरते. चला तर मग लगेच जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

  • फुल फॅट दूध – १ लिटर
  • ताजा किसलेला नारळ – १ कप
  • साखर – ½ कप (चवीनुसार कमी-जास्त)
  • वेलदोड्याची पूड – ½ टीस्पून
  • बदाम, काजू आणि पिस्ता – २ टेबलस्पून (कापून)
  • केशर धागे – काही (ऐच्छिक)
  • कंडेन्स्ड मिल्क – ¼ कप (घट्टपणा आणि चव वाढवण्यासाठी, ऑप्शनल)
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीची ‘फ्रुट जेली’ घरी कशी तयार करायची; आजच जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

कृती :

  • एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध घ्या आणि मध्यम आचेवर उकळायला ठेवा. दूध उकळू लागल्यावर गॅस मंद करून सतत हालवत रहा, जेणेकरून ते खाली लागू नये.
  • दूध अर्धे होईपर्यंत आटवा. यावेळी वर तयार होणारी मलाई बाजूला लावत राहा. हीच मलाई रबडीला खास टेक्स्चर देते.
  • आता त्यात किसलेला ताजा नारळ घाला आणि चांगले मिसळा. नारळाचा गोड सुगंध दुधात मिसळू द्या.
  • दूध आणि नारळ मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहा.
  • आता त्यात वेलदोड्याची पूड, बदाम, काजू आणि पिस्ता घाला. केशर घालायचं असल्यास या टप्प्यावर तेही मिसळा.
  • जास्त क्रीमी आणि समृद्ध चव हवी असल्यास कंडेन्स्ड मिल्क घाला. हे मिश्रण आणखी ५-७ मिनिटे घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • गॅस बंद करून रबडी खोलीच्या तापमानाला थंड होऊ द्या. नंतर ती फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करा. वरून
  • थोडा सुका मेवा आणि नारळाचे काप घालून सजवा.
  • नारळ रबडी दीर्घकाळ टिकवायची असेल तर ती नेहमी फ्रीजमध्ये ठेवा.
  • नारळाची चव जास्त आवडत असल्यास थोडं नारळाचं दूधही वापरू शकता.
  • ही रबडी गरम गुलाबजामसोबत किंवा मालपुऱ्यासोबत सर्व्ह केली तरी अतिशय स्वादिष्ट लागते.
  • ही सुगंधी, मऊ आणि चविष्ट नारळ रबडी नक्की करून बघा, सणासुदीच्या गोड पदार्थांना एक नवा ट्विस्ट
  • देण्यासाठी ही रेसिपी परिपूर्ण आहे!

Web Title: Diwali 2025 make sweet coconut rabdi at home note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 10:35 AM

Topics:  

  • Diwali 2025
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
1

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट
4

Ganeshotsav 2026 : यंदाचा गणेशोत्सव साजरा करा हटके, घरी बनवा दुबई स्टाईल ‘कुनाफा मोदक’, रेसिपी करा नोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.