Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा वाटतो? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल स्वच्छ

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी करण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार आणि नैसर्गिकरित्या सुंदर दिसते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 21, 2026 | 01:47 PM
डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा वाटतो? स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल स्वच्छ

डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्समुळे चेहरा थकल्यासारखा वाटतो? स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांच्या वापरामुळे त्वचा होईल स्वच्छ

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पाण्याची कमतरता, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरासोबतच त्वचेवर लगेच दिसून येतो. चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण डोळ्यांखाली आलेल्या डार्क सर्कल्सकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. डोळ्यांभोवती आलेले काळे डाग त्वचेचे सौंदर्य कमी करून टाकतात. तर काहीवेळा डोळे अतिशय काळे पडल्यामुळे वय जास्त दिसते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीन पाहणे, कामाचा अतिरिक्त ताण आणि अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम डोळ्यांवर लगेच दिसून येतो. डोळ्यांखाली त्वचा काळी पडल्यानंतर अनेक वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. तर काहीवेळा काळे डाग कमी करण्यासाठी महिला ट्रीटमेंट करून घेतात.(फोटो सौजन्य – AI)

Skin Care Tips: पिंपल्स आणि कोरड्या त्वचेवर ‘या’ पद्धतीने लावा बेसन, टॅनिंगच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका

डोळ्यांभोवती आलेल्या काळ्या डागांमुळे चेहरा सतत थकलेला, निस्तेज आणि आजारी असल्यासारखा वाटतो. हे डाग लपवण्यासाठी वारंवार महिला केमिकल युक्त महागड्या अंडर-आय क्रीम्सवर हजारो रुपये खर्च करतात. पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांभोवती आलेले काळे डाग घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ त्वचा हायड्रेट ठेवण्यासोबतच डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी करण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी करण्यासाठी घरगुती उपाय:

डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी करण्यासाठी बटाट्याचा वापर करावा. यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात, ज्यामुळे डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. यासाठी बटाट्याचा रस किसून त्यातील रस काढून घ्या. त्यानंतर कापसाच्या गोळ्याने रस डोळ्यांभोवती लावून काहीवेळ तसाच ठेवा. १५ ते २० मिनिटं ठेवल्यानंतर डोळ्यांवरून काढा. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार होईल. ७ दिवस नियमित बटाट्याचा रस डोळ्यांवर लावल्यास त्वचा अधिक सुंदर दिसेल.

दुधामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवरील काळे डाग घालवण्यास मदत करतात. वाटीमध्ये कच्चे दूध घेऊन त्यात कॉटन बुडवून डोळ्यांवर ठेवा. १५ मिनिटं डोळ्यांवर ठेवल्यास थंडावा जाणवणे आणि डोळ्यांमध्ये वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल. याशिवाय दुधाची साय लावून हलक्या हाताने मसाज केल्यास डेड स्किन निघून जाण्यास मदत होईल.

वजन वाढल्यानंतर ते कमी करताना नियमित काहींना ग्रीन टी पिण्याची सवय असते. पण ग्रीन टी ची बॅग फेकून न देता फ्रिजमध्ये ठेवून द्यावी. थंड झाल्यानंतर डोळ्यांवर लावून १० ते १५ मिनिट ठेवा. यामध्ये असलेले कॅफिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स डोळ्यांभोवती आलेली सूज आणि काळेपणा कमी करण्यास मदत करतील. ग्रीन टी केवळ शरीरसाठीच नाहीतर संपूर्ण त्वचेसाठी फायदेशीर ठरते.

सुरकुत्या आणि निस्तेजपणाला रामराम; ३ कोरियन ब्युटी हॅक्सने चाळिशीतही दिसाल विशीतले; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांची घ्या मदत

वाटीमध्ये टोमॅटोचा रस घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करा आणि डोळ्यांवर लावा. काहीवेळ ठेवल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका. टोमॅटोचा रस आणि लिंबाच्या रसात खूप जास्त विटामिन सी असते. यामुळे डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. १० दिवस नियमित लावल्यास डोळे उजळदार होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do dark circles under your eyes make your face look tired using these kitchen ingredients will clear up your skin

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
1

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack
2

Skin Care: पिगमेंटेशन, टॅनिंगमुळे त्वचा काळी दिसते? मग संत्री मोसंबीच्या सालींचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C Face Pack

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
3

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट
4

Skin Care Tips: सप्टेंबरच्या सणांमध्ये त्वचेची काळजी घ्या काळजी! बॅगेत आवर्जून ठेवा ‘हे’ स्किन केअर प्रॉडक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.