मुतखड्यामुळे ओटीपोटात कायमच वेदना होतात? मग 'या' पदार्थांचे आहारात अजिबात करू नका सेवन
धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक ताण, जंक फूडचे अतिसेवन, पचनाच्या समस्या इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. किडनी स्टोन झाल्यानंतर पोटात किंवा ओटीपोटात खूप जास्त तीव्र वेदना होतात. या वेदना उद्भवल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन करतात. पण वारंवार पेनकिलरच्या गोळ्यांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे किडनी स्टोन झाल्यानंतर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे किडनीमध्ये खड्डे निर्माण होतात. हे खड्डे मूत्रपिंडात अडकल्यामुळे लघवीमध्ये वेदना किंवा जळजळ वाढते. आहारात खाल्ले जाणारे टेस्टी किंवा काही हेल्दी पदार्थ किडनी स्टोन होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनी टाळण्यासाठी कोणत्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
दैनंदिन आहारात जास्त ऑक्सलेट असलेले पदार्थ खाऊ नये. या पदार्थांच्या सेवनामुळे किडनीच्या आजारांचा धोका वाढतो. पालक, बीट, शेंगदाणे, बदाम, काजू आणि चॉकलेटमध्ये खूप जास्त प्रमाणात ऑक्सलेट आढळून येते. ऑक्सलेटयुक्त पदार्थ शरीरात गेल्यानंतर कॅल्शियम सोबत मिक्स होतात, ज्यामुळे किडनीमध्ये बारीक बारीक कण साचून राहण्यास सुरुवात होते. त्यामुळे आहारात कमीत कमी प्रमाणात ऑक्सलेट असलेले पदार्थ खावे. या पदार्थांऐवजी काकडी, टरबूज, द्राक्षे, फुलकोबी इत्यादी जास्त पाणी असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
काहींना जेवणातील पदार्थांमध्ये खूप जास्त मीठ खाण्याची सवय असते. पण ही सवय अतिशय चुकीची आहे. जास्त प्रमाणात मीठ खाल्यामुळे किडनीमध्ये बारीक बारीक खड्डे तयार होतात. खारट पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करून आहारात ताज्या भाज्या, फळे, घरगुती अन्न आणि हलके मसाले वापरून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
दीर्घकाळ Kiss करणे ओठांवर पडू शकते भारी, इंटरनेटवर का घेतला जातोय Deep Kissing उपायांचा जास्त शोध?
गोड पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. साखरयुक्त कोल्ड्रिंक, सोडा, पॅकेज्ड ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स यामध्ये फ्रुक्टोज जास्त असते. शरीरात फ्रुक्टोज वाढल्यानंतर मूत्रपिंडात खड्डे तयार होतात.किडनीची समस्या काहींना अतिशय सामान्य वाटते. पण कालांतराने खड्डे वाढू लागल्यानंतर पोटात वेदना होणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना, मासिक पाळीतील वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवतात.
किडनी स्टोन म्हणजे?
किडनी स्टोन मूत्रपिंडात तयार होणारे खनिजांचे लहान आणि कठीण गोळे असतात, जे तीव्र वेदना आणि अस्वस्थता निर्माण करू शकतात. पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे हे किडनी स्टोनचे एक प्रमुख कारण आहे.
किडनी स्टोनची लक्षणे:
पाठीत, कमरेत किंवा बरगड्यांच्या खाली तीव्र आणि अचानक वेदना होणे हे एक प्रमुख लक्षण आहे. लघवी करताना जळजळ होणे, लघवीचा रंग बदलणे किंवा लघवीतून रक्त येणे.
किडनी स्टोनवर उपाययोजना:
आहारात सोडियमचे प्रमाण कमी ठेवा आणि जास्त प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन टाळा. फळे आणि भाज्या यांसारखे फायबरयुक्त पदार्थ आहारातून जास्त प्रमाणात घ्या.