
रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, अन्यथा झोप आणि पचनक्रियेवर होईल गंभीर परिणाम
रात्रीच्या वेळी कोणते पदार्थ खाऊ नये?
अपचन होण्याची कारणे?
पचनक्रियेवर परिणाम करणारे पदार्थ कोणते?
रोजच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत सतत काहींना काही खाल्ले जाते. फळे, जेवणातील विविध पदार्थ, जंक फूड इत्यादी पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी झोपताना डिझर्ट किंवा गोड पदार्थ आवडीने खाल्ले जातात. रात्रीची झोप आणि जेवण यामध्ये ३ तासांचे अंतर असणे फार आवश्यक आहे. पण कामाच्या धावपळीमध्ये सतत जंक फूडचे सेवन केल्यानंतर लगेच झोप येते. अन्नपदार्थ खाऊन लगेच झोपल्यामुळे खाल्ले अन्न व्यवस्थित पचन होत नाही. ज्याच्या परिणामामुळे गॅस, पोट फुगणे, जडपणा आणि झोपेच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत पदार्थ.(फोटो सौजन्य – istock)
फळे खाणे शरीरासाठी खूप जास्त चांगले मानले जाते. पण चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते. रात्रीच्या जेवणासोबत किंवा सकाळच्या नाश्त्यात फळे किंवा फळांचा रस पिणे फायदेशीर मानले जाते. पण रात्रीच्या जेवणानंतर फळांचे सेवनकरणे फायदेशीर नाही. फळे खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढते आणि शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय रात्री पोट फुगल्यामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते.
वजन वाढेल या भीतीने रात्रीच्या जेवणात अन्नपदार्थांचे सेवन केले जात नाही. पण असे केल्यामुळे वजन कमी होण्याऐवजी शरीराला गंभीर आजारांची लागण होते. कारण अंकुरित धान्य खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि कढधान्य पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पचनक्रियेवर ताण वाढतो आणि अपचनाच्या समस्या उद्भवतात.
पोषक घटकांनी समृद्ध असलेली पालक भाजी रात्रीच्या जेवणात अजिबात खाऊ नये. रात्रीच्या वेळी पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे पालकमधील लोह आणि फायबर पचन होणे कठीण होऊन जाते. अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पोटात जडपणा जाणवू लागतो, ज्यामुळे झोप खराब होते. याशिवाय रात्रीच्या जेवणात दह्याचा अजिबात समावेश करू नये. दही कायमच दुपारच्या वेळी खावे. रात्रीच्या वेळी पचनक्रिया सामान्यपेक्षा खूप जास्त मंदावते, ज्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाही.
Ans: जेवणानंतर जड, तळलेले, खूप तिखट किंवा जास्त साखर असलेले पदार्थ टाळणे चांगले. चहा-कॉफी, चॉकलेट आणि कॅफिनयुक्त पदार्थही झोपेवर परिणाम करू शकतात.
Ans: रात्री जेवणानंतर वारंवार गोड पदार्थ खाल्ल्यास अतिरिक्त कॅलरीचे सेवन होऊ शकते. त्यामुळे गोड पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवणे चांगले.
Ans: होय. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. विशेषतः कॅफिनची संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींमध्ये रात्री त्याचे सेवन केल्यास झोप लागण्यास अडथळा येऊ शकतो.