
आतड्यांमधील घाण एका झटक्यात पडून जाईल बाहेर! चांगले बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश
Gut Health: पचनसंस्था कायमच निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात दही, ताक आणि इतर थंड पदार्थांचे सेवन केले जाते. पण बऱ्याचदा जीवनशैलीतील छोट्या मोठ्या चुकांमुळे शारीरिक आरोग्य बिघडून जाते. दुपारच्या जेवणात वाटीभर दही किंवा ताक प्यायल्यास पचनक्रिया सुधारते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. याशिवाय आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात प्रोबायोटिक्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. प्रोबायोटिक्स पचनसंस्थेत उपयुक्त जिवंत सूक्ष्मजीव पाठवतात, ज्याच्या परिणामामुळे जीवाणूंना पोषण मिळते. अपचन, ऍसिडिटी किंवा गॅस झाल्यानंतर आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते.(फोटो सौजन्य – istock)
आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे आतड्यांसोबतच संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. त्यामुळे पचनसंस्था सुधारण्यासाठी केवळ ताकावर अवलंबून न राहता आहारात इतर पदार्थांचा समावेश करणे फार आवश्यक आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांमधील मल मऊ होण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. आतडे डिटॉक्स करण्यासाठी कोणत्याही महागड्या सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करण्याची अजिबात आवश्यकता नाही.
पोटाचे आरोग्य जपण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सची अजिबात आवश्यकता नसते. आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे स्वयंपाक घरातील पदार्थांचे सेवन करावे. केळ्यामध्ये फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च असतात, त्यामुळे कच्च्या केळ्यांचे थोड्या प्रमाणात सेवन करावे. अर्धवट कच्च्या केळीचे सेवन केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळेल.
राजमा, चणे, मूग आणि इतर डाळींमधून फायबर आणि रेझिस्टंट स्टार्च शरीराला मिळतात. ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कांदा आणि लसूणमध्ये इनुलिन आणि इतर आंबवण्यायोग्य फायबर्स असतात. गाजर, बीन्स, पालेभाज्या आणि हंगामी भाज्यांमधून शरीराला आवश्यक फायबर मिळते. पपई खाल्ल्यामुळे आतड्यांची हालचाल कायम सुलभ राहते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पपई खावी. आंबवलेल्या पदार्थांमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. सकाळच्या नाश्त्यात इडली, डोसा खाणे फायदेशीर मानले जाते.
पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी आहारासोबतच भरपूर पाणी, शारीरिक हालचाल, संतुलित आहार घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. शांत झोप घेणे आणि मानसिक ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन केल्यास पचनसंस्था निरोगी राहील आणि शरीराला सुद्धा फायदे होतील. आहारात फायबरचे प्रमाण कमी असल्यास अचानक ते वाढवू नये. गरजेनुसार आणि शरीराच्या क्षमतेनुसार पोषक आहार घ्यावा. गॅस, पोट फुगणे किंवा अस्वस्थता टाळण्यासाठी व्यायाम आणि योगासने सुद्धा करावीत.
Ans: आतड्यांमध्ये नैसर्गिकरीत्या असणाऱ्या उपयुक्त सूक्ष्मजीवांना चांगले बॅक्टेरिया म्हणतात. हे पचनक्रिया, पोषक घटकांचे शोषण आणि रोगप्रतिकारक शक्तीला मदत करतात.
Ans: दही, ताक, इडली, डोसा यांसारखे आंबवलेले पदार्थ तसेच केळी, ओट्स, लसूण, कांदा, कडधान्ये आणि विविध भाज्यांचा आहारात समावेश करावा.
Ans: दह्यामध्ये काही प्रकारचे उपयुक्त जिवंत बॅक्टेरिया असू शकतात. नियमितपणे ताजे आणि साखर न घातलेले दही खाल्ल्याने काही लोकांच्या पचनाच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.