उन्हाळ्यात शरीरसंबंधित दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, उद्भवू शकतो हार्ट अटॅकचा धोका
हार्ट अटॅकची लक्षणे?
उन्हाळ्यात हार्ट अटॅकची कोणती लक्षणे दिसतात?
हृदयाचे आरोग्य कशामुळे बिघडते?
जगभरात हार्ट अटॅकच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर योग्य वेळी उपचार न झाल्यास संबंधित व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आजारपणात सुद्धा वाढ होते. सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त चिडचिडेपणा वाढतो. याशिवाय घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाते आणि थकवा, अशक्तपणा वाढतो. अशावेळी अनेक लोक दुर्लक्ष करतात. कडक उन्हात घरातुन कामानिमित्त बाहेर पडून गेल्यावर काही मिनिटांमध्येच कपडे पूर्णपणे ओले होऊन जातात. याशिवाय चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे इत्यादी अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. या सगळ्याचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो.(फोटो सौजन्य – istock)
डॉक्टरांच्या मते, हृदयाचे नुकसान झाल्यानंतर शरीरात फारशी लक्षणे दिसून येत नाही. अतिशय सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. शरीराचे आतून नुकसान झाल्यानंतर कोणतीही गंभीर लक्षणे दिसत नाही. पण कालांतराने आजाराचा धोका वाढतो. हार्ट अटॅक येण्याच्या काहीदिवस आधी थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. पण या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दलसविस्तर माहिती सांगणार आहोत. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
केवळ छातीमध्ये दुखणे हे हार्ट अटॅक किंवा हृद्यासंबंधित आजाराचे लक्षण नसते. हार्ट अटॅक हा सायलेंट किलर आजार आहे. या आजाराची लक्षणे शेवटच्या टप्यात दिसू लागतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य वाटणारी लक्षणे पुढे जाऊन फार गंभीर होतात आणि हृदयाचे नुकसान करतात. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेल्या पिवळ्या रंगाच्या चिकट थरामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात. रक्तवाहिन्यांवर जास्तीचा तणाव निर्माण झाल्यामुळे शरीरातील लहान मोठ्या अवयवांना व्यवस्थित ऑक्सिजन पुरवठा होत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊ शकतो.
हलकी कामे केल्यानंतर दम लागणे, थकवा अशक्तपणा वाढणे, झोपल्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या चिकट थरामुळे श्वास घेण्यास अडथळे निर्माण होतात. याशिवाय कोणतेही कारण नसताना सतत थकवा जाणवणे, हातापायांमध्ये वेदना, पाय, गुडघे किंवा पायाच्या तळव्यांना सूज येणे, जबड्यात, खांद्यात, हातात किंवा पाठीमध्ये वेदना होणे इत्यादी वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. महिला आणि पुरुषांमध्ये हार्ट अटॅकची वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात.
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर थंड घाम येणे, मळमळ होणे किंवा उलटीसारखे वाटणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच रात्रीच्या वेळी काहींना खूप जास्त खोकला येतो. तसेच व्यवस्थित झोप न लागणे इत्यादी लक्षणे कालांतराने गंभीर आजार होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे शरीरात हार्ट अटॅक संबंधित लक्षणे दिसू लागल्यास वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
Ans: छातीत मध्यभागी किंवा डाव्या बाजूला दाब, घट्टपणा, वेदना किंवा जळजळ होणे [४, १२]. याव्यतिरिक्त, श्वास लागणे, चक्कर येणे, मळमळ किंवा थंड घाम येणे.
Ans: होय, महिलांना छातीत वेदनेव्यतिरिक्त पाठ, मान, जबडा, पोटात वेदना, खूप थकवा, मळमळ किंवा अपचनासारखा त्रास होऊ शकतो.
Ans: धूम्रपान, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह, लठ्ठपणा, खराब जीवनशैली, बैठी जीवनपद्धती आणि कौटुंबिक इतिहास ही प्रमुख कारणे आहेत.






