तरुणांमध्ये का वाढते मूळव्याधीची समस्या? गंभीर समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
मूळव्याध होण्याची कारणे?
मूळव्याधीवर घरगुती उपाय?
मूळव्याधीवर बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय?
जगभरातील सर्वच लोकांच्या जीवनशैलीत असंख्य बदल झाले आहेत. हार्ट अटॅक, मधुमेह, कॅन्सर, मूळव्याध इत्यादी गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. शरीरसंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. पण कालातंराने या समस्या आणखीनच तीव्र होतात आणि गंभीर स्वरूप घेतात. हल्ली लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकाला मूळव्याध होत आहे. तरुणांमध्ये मूळव्याध होण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारात होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पोषक घटकांची कमतरता, बद्धकोष्ठता, पाण्याचे कमी सेवन इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणांमुळे मूळव्याधीच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अनेकांना रक्तस्रावी मूळव्याधीची लागण होते,ज्यामध्ये शौचाच्या वेळी रक्तस्त्राव होऊन नाजूक अवयवांना हानी पोहचते.(फोटो सौजन्य – istock)
उन्हाळ्यात फ्लाइट्समध्ये कपात! इंडिगोसह विमान कंपन्यांना फटका, DGCA ने सादर केले वेळापत्रक
मूळव्याध झाल्यानंतर वारंवार अपचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते. मसालेदार पदार्थांचे अतिसेवन आणि अपुरे पाणी पिणे इत्यादी गोष्टींमुळे मूळव्याध होतो. मूळव्याध झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. पण कालातंराने लक्षणे वाढतात. जास्त वेळ एका जागेवर बसून राहिल्यामुळे मूळव्याध होतो. तसेच बऱ्याचदा मूळव्याध झाल्यानंतर डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. पण शस्त्रक्रिया केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मूळव्याध होतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मुळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
मूळव्याध झाल्यानंतर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. यासाठी एक ग्लास गाईचे दूध उकळवून घ्यावे. त्यानंतर दूध थंड करून घ्या. थंड दुधात लिंबाचा रस टाकून मिक्स न करता प्यावे. हा उपाय तीन दिवस नियमित केल्यास मूळव्याध आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल. रक्तस्त्राव होणारा मूळव्याध नष्ट करण्यासाठी दूध आणि लिंबाचा उपाय प्रभावी ठरेल. मागील बऱ्याच वर्षांपासून हा उपाय केला जात आहे.
दुसरा उपाय म्हणजे पिकलेलं केळ घेऊन त्यात वाटाण्याच्या दाण्यांऐवढे कपूर भरून घ्या. त्यानंतर केळ खाताना कपूर चावून न खाताना डायरेक्ट गिळून टाकावा. कपूर चावू नये तर कपूर गाळावा. यामुळे तुम्हाला पहिल्याच दिवसांपासून फरक जाणवू लागेल. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. त्यामुळे तीन दिवस नियमित केळ आणि कपूर खावा. मुळव्याधावर हा एक प्रभावी उपाय मानला जातो.
बिंज इटिंग म्हणजे काय? सतत ‘खाण्याचा’ आजार शरीरासाठी ठरेल धोक्याचा, जाणून घ्या सविस्तर माहिती
मूळव्याध आणि जुनाट बद्धकोष्ठतेपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी कोमट पाण्यात त्रिफळा पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय वाढत्या मूळव्याधीवर बाबा रामदेव यांनी सांगितलेले उपाय सुद्धा प्रभावी ठरतील. अश्वगंधा, गुळवेल आणि कडुलिंबाचा काढा नियमित फरक दिसून येईल. तसेच ताडासन, पवनमुक्तासन, मालासन आणि कपालभाती योगासन केल्यास पचनाच्या समस्या अजिबात उद्भवणार नाहीत.
Ans: शौचाच्या वेळी वेदनाहीन लाल रक्त येणे, गुदद्वाराला खाज सुटणे, सूज किंवा वेदना, आणि शौचानंतरही पोट साफ न झाल्याची भावना होणे.
Ans: बद्धकोष्ठता (Constipation), शौचाच्या वेळी जास्त जोर लावणे, गर्भधारणा, वजन उचलणे, आणि जास्त वेळ टॉयलेट सीटवर बसून राहणे ही मुख्य कारणे आहेत.
Ans: दिवसातून २-३ वेळा १०-१५ मिनिटे कोमट पाण्यात बसणे, आहारात फळे, भाज्या आणि कडधान्यांचा समावेश करणे.






