
पावसाळ्यात Food Poisoning झाल्यानंतर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जीवनशैलीत करा वेळीच बदल
अन्नातून विषबाधा होण्याची कारणे?
पावसाळ्यात अन्नातून विषबाधा का होते?
अन्नातून विषबाधा झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:
वातावरणात सतत होणारे बदल, आहारात पोषक घटकांची कमतरता, जंक फूडचे अतिसेवन, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. याशिवाय पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर विकतचे पदार्थ किंवा उघड्यावरील कोणतेही अन्न खाल्ल्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. अन्नपदार्थांमधून विषबाधा झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसू लागतात. एखादा पदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अचानक उलट्या, जुलाब होऊन आरोग्याचं बिघडून जाते. काहीवेळा परिस्थिती अतिशय गंभीर होऊन जाते. स्वयंपाक घरात होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका, चुकीच्या पद्धतीने अन्न साठवून ठेवणे, दूषित पाणी इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीराला हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
जिवाणू, विषाणू, परजीवी किंवा काही विषारी पदार्थांमुळे अन्न दूषित आणि खराब होऊन जाते. खराब झालेले अन्नपदार्थ किंवा शिळे झालेले अन्न खाल्ल्यामुळे मळमळ, उलटी, पोटदुखी, जुलाब, ताप किंवा अशक्तपणा यांसारखी विविध लक्षणे दिसू लागतात. तसेच अन्नपदार्थ व्यवस्थित न शिजवल्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे अन्न व्यवस्थित शिजवणे फार आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अन्नातून विषबाधा झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जीवनशैलीत झालेल्या बदलांचा थेट परिणाम शरीरावर दिसू लागतो.
उष्ण वातावरणात जास्त वेळ अन्नपदार्थ ठेवल्यामुळे ते लगेच खराब होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून आणि योग्य ठिकाणी ठेवणे फार आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याचदा असेच वाटते की, फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ चांगले आणि सुरक्षित राहते. पण असे नसून काहीवेळा फ्रिजमधील अन्न सुद्धा खराब होऊन जाते. कच्च्या आणि शिजलेल्या पदार्थांचा एकमेकांशी संपर्क आल्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशन होऊन अन्नपदार्थांमधून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते. अस्वच्छ भांडी, खराब झालेले स्पंज, घाणेरडे किचन काउंटर किंवा दूषित पाण्यात भांडी घासल्यामुळे जिवाणू तसेच टिकून राहते. हेच हानिकारक घटक अन्नावाटे शरीरात प्रवेश करतात आणि आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतात.
Ans: पावसाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेमुळे काही सूक्ष्मजीवांची वाढ होऊ शकते. दूषित पाणी, अस्वच्छ अन्न किंवा योग्य प्रकारे साठवलेले नसलेले पदार्थ खाल्ल्याने Food Poisoning होऊ शकते.
Ans: मळमळ, उलट्या, जुलाब, पोटदुखी, पोटात कळा, ताप आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. लक्षणांची तीव्रता संसर्गाच्या कारणानुसार बदलू शकते.
Ans: उलट्या किंवा जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊ शकतात. त्यामुळे पुरेसे द्रवपदार्थ आणि आवश्यक असल्यास ORS घेणे महत्त्वाचे आहे. आहाराबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.