
कडाक्याच्या उन्हाळ्यात जेवणात अजिबात करू नका 'या' पदार्थांचा समावेश, अन्यथा उद्भवतील पचन आणि पोटाच्या गंभीर समस्या
उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाऊ नये?
उन्हाळ्यात शरीराची काळजी कशी घ्यावी?
निरोगी राहण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
राज्यासह संपूर्ण देशभरात तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. तापमान वाढल्यानंतर शरीरावर त्याचे परिणाम थेट दिसू लागतात. वाढत्या तापमानाचा परिणाम पचनक्रियेवर लगेच होतो. हळूहळू शरीराची पचनक्रिया मंदावते आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. या दिवसांमध्ये आहारात तिखट किंवा अतितेलकट पदार्थांचा समावेश केल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. या दिवसांमध्ये खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. बऱ्याचदा भूक लागल्यानंतर विकतचा वडापाव, भेळ, पाणीपुरी इत्यादी वेगवेगळे पदार्थ आणून खाल्लेले जातात. सतत तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढते आणि अपचनाचा त्रास वाढून आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात या पदार्थांचे अजिबात सेवन करू नका.(फोटो सौजन्य – istock)
कोमट की थंड? औषध खाताना कोणते पाणी पिणे शरीरासाठी ठरेल योग्य, पहा गोळ्या खाण्याचा सोपा नियम
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात अनेकांना तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाण्याची जास्त सवय असते. समोसे, कचोरी, वडे, भजी खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त सवय असते. हे पदार्थ पचनासाठी अतिशय जड असतात. खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे उलट्या दिशेने वर येतात आणि घशात किंवा अन्ननलिकेमध्ये चिकटतात. ज्यामुळे वारंवार उलट्या, मळमळ किंवा पित्ताचा खूप जास्त त्रास होतो. त्यामुळे आहारात सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. उकडलेल्या भाज्या, ताजी फळे, कडधान्य इत्यादी पदार्थ खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते.
लाल मांस शरीरासाठी अतिशय घातक आहे. यामध्ये प्रोटीन आणि फॅटचे प्रमाण खूप जास्त असते, जे पचनासाठी जास्तीचा वेळ लागतो. लाल मांस पचन करण्यासाठी शरीराला जास्तीची ऊर्जा खर्च करावी लागते. ज्याच्या परिणामामुळे पोटावर तणाव येतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मटण आणि लाल मांस खाणे टाळावे. अन्यथा पोटात जडपणा किंवा सुस्ती आल्यासारखे वाटू शकते.
दैनंदिन जेवणात काहींना खूप जास्त तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाण्याची सवय असते. पण उन्हाळ्यात वारंवार मसालेदार तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात जळजळ, ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढू शकतात. वारंवार कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर अपचन होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. कारण पोटासंबंधित आजारांची लागण झाल्यानंतर अपचनाच्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात धणे, हळद आणि जिऱ्याचे सेवन जास्त करावे.
तळपायांमध्ये कायमच जळजळ आणि आग होते? शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. कामाच्या धावपळीमुळे आहारात कायमच जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड खाल्ले जाते. हे पदार्थ लहान मुलांनासुद्धा खूप जास्त आवडतात. पण जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये जास्तीचे मीठ आणि तेल असते, ज्याच्या थेट परिणाम किडनी आणि लिव्हरच्या आरोग्यावर होतो. वारंवार विकतचे जंक फूड खाल्ल्यामुळे शरीरात विषारी घटक वाढू लागतात.
Ans: तिखट, तेलकट, फास्ट फूड, जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळावेत.
Ans: तिखट पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात, ज्यामुळे पचनाचे त्रास होऊ शकतात.
Ans: उष्ण हवामान, पाण्याची कमतरता, चुकीचा आहार आणि अनियमित जेवण या कारणांमुळे पचन बिघडते.