साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
देशभरात सगळीकडे पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर साथीच्या आजारांमध्ये मोठी वाढ होते. सर्दी, खोकला, सतत ताप किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या उद्भवू लागतात. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. या दिवसांमध्ये सतत बदलणारे वातावरण आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर बाहेरील विकतचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्याऐवजी आहारात घरी बनवलेले पौष्टिक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावे. साथीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. ज्यामुळे वारंवार चक्कर येणे, शरीरात सतत अशक्तपणा जाणवू लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.(फोटो सौजन्य – iStock)
जिभेच्या रंगांवरून ओळखा भयंकर आजाराची लक्षणे! ‘या’ रंगाची जीभ दिसताच डॉक्टरांचा घ्या योग्य सल्ला
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लसूण खाण्यास जास्त प्राधान्य द्यावे. कारण लसणीमध्ये असलेले गुणधर्म साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करतात. ककान किंवा घशाचे इन्फेक्शन टाळण्यासाठी लसणीच्या पाकळ्या ठेचून कानाच्या वरच्या भागावर ठेवाव्या. या पाकळ्या ठेवल्यानंतर त्या कानात जाणार नाहीत, याची योग्य काळजी घ्यावी. सर्दी किंवा खोकला लागल्यास तुपामध्ये लसूण पाकळ्या भाजून खाव्यात. यामुळे शरीरातील सर्व घाण बाहेरील पडून जाईल आणि साथीच्या आजारांपासून सुटका मिळेल. याशिवाय शरीरात वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी लसूण पाकळ्या आणि टोमॅटोचा वापर करून सूप तयार करावे.
औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद अनेक आजारांवर गुणकारी आहे. यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म सुद्धा आढळून येतात. हळदीमध्ये आढळून येणारे जंतुनाशक गुणधर्म शरीरात विषाणू वाढू देत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये हळदीच्या दुधाचे सेवन करावे. तसेच तुम्ही सकाळी उथळून रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्याचे सुद्धा सेवन करू शकता. सर्दी, खोकल्यापासून कायमचा आराम मिळवण्यासाठी हळद अतिशय प्रभावी आहे.
घशात वाढलेली खवखव कमी करण्यासाठी हळदीच्या चहाचे सेवन करावे. टोपात पाणी गरम करून त्यात हळद टाकून मिक्स करा. त्यानंतर टोपातील पाण्याला उकळी उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस मिक्स करून सेवन करा. यामुळे घश्यात वाढलेली खवखव कमी होईल आणि तात्काळ आराम मिळेल.
पावसाळ्यात सर्वच घरांमध्ये काढा बनवला जातो. काढ्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आणि विषाणू बाहेर पडून जातात. त्यामुळे पावसाळ्यात नियमित काढा प्यावा. गवती चहा, आलं, लवंग, काळामिरी व दालचीनी इत्यादी अनेक मसाल्यांचा वापर करून बनवलेला काढा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.