सतत गोड पदार्थ खाण्याची क्रेव्हिंग होते? अतिसाखरेचे सेवन केल्यास चेहऱ्यावर पडू शकतो काळेपणा, दिसू लागतील सुरकुत्या
प्रत्येकाला आपण नेहमीच सुंदर दिसावं असं वाटतं. होय ना? कमी वयात चेहऱ्यावर सुरकुत्या कोणालाच नको असतात. पण तुम्हाला माहित्ये का? त्वचेची चमक केवळ चेहऱ्यावर लावलेल्या उत्पादनांवरच नाही, तर आहारावरही अवलंबून असते. चुकीच्या आहारामुळे चेहऱ्याची चमक कमी होऊ शकते. विशेषतः साखरेचे अतिसेवन त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहे. याचा नक्की कसा परिणाम होतो हेच आज आपण व्हिडिओतून जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
लोक दररोज चहापासून कॉफीपर्यंत बऱ्याच पदार्थांमधून साखर पोटात जात असते. इतकंच काय सतत गोड खाण्याचे क्रेव्हिंगही अनेकांना होत असते. पण साखरेच्या सेवनाने डाग आणि सुरकुत्यांचा धोका वाढतो. गोड पदार्थ चविष्ट असतात, पण ते त्वचेसाठी अत्यंत हानिकारक आहेत. साखरेच्या अतिसेवनामुळे सूज, डाग आणि पुरळ येऊ शकते.
View this post on Instagram
तुम्हाला सतत जर गोड खाण्याचे क्रेव्हिंग असेल आणि त्यामुळे त्वचा खराब होत असेल तर तुमची त्वचा सुधारण्यासाठी, साखरेचे सेवन मर्यादित करा. जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल, तर नैसर्गिक साखर किंवा स्वीटनर्स वापरा. याव्यतिरिक्त, सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होईल. तुम्हीही सतत गोड खात असाल तर आताच याचं प्रमाण कमी करा.
Ans: अतिसाखरेचे सेवन त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिनवर परिणाम करणाऱ्या ग्लायकेशन प्रक्रियेला प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे कालांतराने त्वचेची लवचिकता कमी होऊन अकाली वृद्धत्वाची चिन्हे दिसण्यास हातभार लागू शकतो.
Ans: साखर थेट चेहरा काळा करते असे ठोसपणे म्हणता येत नाही. मात्र अतिसाखरेचा आहार शरीरातील चयापचय आणि दाहाशी संबंधित प्रक्रियांवर परिणाम करू शकतो, ज्याचा त्वचेच्या आरोग्यावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो.
Ans: अनियमित आहार, झोपेची कमतरता, ताणतणाव, दीर्घकाळ उपाशी राहणे किंवा सवयीमुळे गोड पदार्थांची क्रेव्हिंग वाढू शकते. संतुलित आहार आणि पुरेशी झोप यामुळे ती नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.



