
पावसाळ्यात केसांमध्ये खूप जास्त कोंडा होतो? केसांमधील चिकटपणा घालवण्यासाठी किती वेळा केस स्वच्छ करावे, जाणून घ्या सविस्तर
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे आरोग्यासोबतच केस आणि त्वचेसंबंधित समस्या सुद्धा उद्भवतात. त्वचा आणि केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर खूप जास्त वैताग येतो. पाऊस पडल्यानंतर केस गळणे, केसांमध्ये वाढलेला चिकटपणा, केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. पावसात केस भिजल्यानंतर ओलसरपणामुळे केसांमध्ये कोंडा होऊन केस चिकट होऊन जातात. वारंवार केस ओले झाल्यानंतर केसांमध्ये चिकटपणा वाढतो आणि केस कोरडे होतात. केस व्यवस्थित स्वच्छ न केल्यास केसांच्या समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आठवड्यातून किती वेळा केस स्वच्छ करावे? केस धुवण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)
वर्षाच्या बाराही महिने केसांच्या समस्या वाढू लागतात. केस गळणे किंवा केस तेलकट चिकट होणे इत्यादी अनेक गोष्टींपासून सुटका मिळवण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या हेअर ट्रीटमेंट तर काहीवेळा महागडे हेअर शाम्पू वापरून केसांची काळजी घेतात. पण याचा फारसा परिणाम केसांवर दिसून येत नाही. केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवावे. कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर किंवा इतर वेळी केस भिजल्यास घरी आल्यानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे.
केस स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही माईल्ड शाम्पूचा वापर करावा. तसेच शाम्पू लावल्यानंतर केस हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावे. यामुळे टाळूवर वाढलेले इन्फेक्शन किंवा कोंडा कमी होण्यास मदत होईल. केस स्वच्छ केल्यानंतर ते व्यवस्थित सुकवून घ्यावे. केस सकाळी लवकर धुवावे. त्यानंतर पुढील ३ ते ४ तासांमध्ये पूर्णपणे सुकलेले असतात. केस ओले राहिल्यास केसांमध्ये कोंडा वाढतो. ओलसर केस कधीच बांधून ठेवू नयेत. यामुळे केसांची गुणवत्ता खराब होते आणि केस चांगले दिसत नाहीत.
केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर
रात्रीच्या वेळी कधीही केस धुवू नयेत. केस धुवण्यासाठी सकाळचा वेळ अतिशय योग्य आहे. यामुळे केस लवकर सुकतात आणि केस स्वच्छ धुवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. केस धुवण्याच्या २ ते ३ तास आधी काहींना तेल लावण्याची सवय असते. या सवयीमुळे केसांमध्ये कोंडा वाढतो आणि केस आणखीनच तेलकट होतात. केसांमधील तेल व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे केस टाळूवर कोंडा वाढतो आणि केस विंचरल्यानंतर सुद्धा चिकट आणि तेलकट दिसू लागतात.