आठवडाभरात चेहऱ्यावरील पिगमेंटशन होतील कायमचे गायब! रात्री झोपण्याआधी नियमित करा 'या' नॅचरल ड्रिंकचे सेवन
सर्वच महिलांना आपली त्वचा कायमच डागविरहित आणि सुंदर, चमकदार हवी असते. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, क्लीनअप तर काहीवेळा अतिशय महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळ्या ब्रँडचे फेस सिरम, फेस मास्क, फेस पॅक लावून त्वचेची काळजी घेतली जाते. पण त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. चेहऱ्यावरील ग्लो केवळ स्किन केअर प्रॉडक्टमुळे नाहीतर आहारात खाल्लेल्या पौष्टिक पदार्थांमुळे सुद्धा वाढतो. वातावरणात होणारे बदल, पोटाचे बिघडलेले आरोग्य आणि चुकीच्या स्किन केअरचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि मुरूम येतात.(फोटो सौजन्य – istock)
केसांची वाढ थांबली आहे? केस झपाट्याने वाढण्यासाठी कोणत्या वेळी तेल लावावे, जाणून घ्या सविस्तर
पचनक्रिया बिघडल्यानंतर ऍसिडिटी होण्यासोबतच चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुमांचे फोड येतात. चेहऱ्यावर आलेले फोड त्वचेचे सौंदर्य नष्ट करून टाकतात. त्यामुळे त्वचेची वरून काळजी घेण्यासोबतच आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरूम घालवण्यासाठी रात्री झोपण्याआधी कोणते नॅचरल ड्रिंक प्यावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या ड्रिंकचे नियमित सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली विषारी घटक बाहेर पडून जाईल आणि शरीर, त्वचा डिटॉक्स होण्यास मदत होईल. पोटाचे आरोग्य बिघडल्यानंतर चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा काळवंडणे, पिंग्मेंटेशन यांसारख्या विविध समस्या उद्भवतात. या समस्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय करावेत.
नॅचरल डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात दीड ग्लास पाणी घेऊन त्यात बडीशेप, ओवा, आल्याचा तुकडा, पुदिन्याची पाने घालून मिक्स करा आणि पाण्याला उकळी काढा. टोपातील पाणी अर्धा होईपर्यंत पाण्याला उकळी काढा. पाण्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करून घ्या आणि पाणी थंड करण्यासाठी ठेवा. तयार केलेले ड्रिंक प्यायल्यानंतर त्यावर कोणताही पदार्थ खाऊ नये. नियमित फ्रेश तयार केलेले ड्रिंक प्यावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. तयार केलेले ड्रिंक हलकेसे गरम असतानाच प्यावे.
वजन काटा कधीच हलत नाही? मग जीवनशैलीत करा ‘हे’ बदल, पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने होईल कमी
ओवा आणि बडीशेपमध्ये अँटी- ऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे नियमित सेवन केल्यास पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. पोटात वाढलेला गॅस आणि अपचनाच्या समस्या कमी करण्यासाठी नियमित नॅचरल ड्रिंक पिणे फायदेशीर ठरेल. लिव्हर आणि आतड्यांचे आरोग्य ठेवण्यासाठी आलं फायदेशीर ठरते. आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आतड्यांमध्ये जमा झालेली घाण स्वच्छ करतात आणि त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यास मदत करतात. नियमित नॅचरल ड्रिंकचे सेवन केल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.






