हेअरस्पा करण्यासाठी सतत पार्लरपेक्षा जावं लागत? मग 'या' पदार्थांचा वापर करून घरीच करा hair spa
उन्हामुळे कोरडे, निस्तेज झालेले केस सुंदर आणि चमकदार करण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. केसांना कधी हेअरमास्क लावणे तर कधी केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. मात्र या ट्रीटमेंट फारकाळ केसांवर टिकून राहत नाहीत. केसांच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेताना वेगवेगळ्या क्रीम्सचा वापर केला जातो. काहींना या क्रीमच्या वापरामुळे इन्फेक्शन सुद्धा होते. त्यामुळे केसांना सूट होतील अशाच ट्रीटमेंट केसांसाठी करून घ्याव्यात. हेअर स्पा, स्ट्रेटनिंग,बायोटीन, केराटीन अशा अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट बाजारात उपलब्ध आहेत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हामुळे शरीरावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, त्वचा होईल गोरीपान
केस कोरडे होणे, केसांमध्ये सतत कोंडा होणे इत्यादी केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक महिला हेअर स्पा करून घेतात. हेअर स्पा केल्यामुळे केस आतून कंडीशनींग होतात. केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करून तुम्ही घरीच हेअर स्पा करू शकता. यामुळे केस मऊ आणि सिल्की होतील. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल. केस सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी केसांना पोषण देणे आवश्यक आहे. याशिवाय दैनंदिन आहारात विटामिन सी युक्त पदार्थांचे जास्त सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला घरगुती पदार्थांचा वापर करून हेअर स्पा करण्याची सोपी पद्धत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.