उन्हामुळे शरीरावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर त्वचा अधिक काळी आणि निस्तेज दिसू लागते. काळवंडलेली त्वचा कितीही काही केलं तरीसुद्धा उजळदार होत नाही. उन्हाळ्यात सूर्याची किरण थेट शरीरावर पडतात, ज्यामुळे चेहऱ्यासह संपूर्ण शरीर काळवंडून जाते.याशिवाय काहीवेळा त्वचा काळी पडल्यानंतर निस्तेज आणि कोरडी दिसू लागतात. अशावेळी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट, बॉडी पॉलिशिंग ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. मात्र तरीसुद्धा त्वचेमध्ये कोणताच बदल दिसून येत नाही. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले प्रॉडक्ट किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून घेण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. आज आम्ही तुम्हाला शरीरावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ्वण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. त्यानंतर त्यात थोडस गुलाब पाणी टाकून मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर बेसनाची पेस्ट संपूर्ण शरीरावर लावून काहीवेळ तशीच ठेवा.न त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. यामुळे तुमच्या त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी निघून जातील आणि त्वचा स्वच्छ होईल. बेसनाचा वापर फेसपॅक, फेसस्क्रब आणि फेसमास्क म्हणून सुद्धा केला जातो. बेसनाचा बॉडी स्क्रब तुम्ही आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा शरीरावर लावू शकता.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडच्या रसाचा वापर केला जात आहे. या रसात असलेले गुणधर्म त्वचा हायड्रेट ठेवतात. याशिवाय टोमॅटोचा रस काळवंडलेली त्वचा उजळ्वण्यासाठी मदत करते. वाटीमध्ये कोरफड जेल घेऊन त्यात टोमॅटोचा रस मिक्स करा. तयार करून घेतलेले मिश्रण संपूर्ण शरीरावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचा उजळदार होईल. टोमॅटोचा रस खराब झालेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी मदत करते. त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी टोमॅटो आणि कोरफडचा रस वापरावा.
विटामिन सी युक्त पदार्थ त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. या पदार्थांमुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होते. त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी दही अतिशय प्रभावी आहे. यासाठी वाटीमध्ये दही आणि संत्र्याचा गर घेऊन घेऊन मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट संपूर्ण शरीरावर, मानेवर आणि चेहऱ्यावर देखील लावू शकता. ५ मिनिटं ठेवल्यानंतर शरीर कोमट किंवा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी तुम्ही संत्र्याचा वापर करू शकता.