चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी 'या' पद्धतीने करा बीटच्या रसाचा वापर
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्वचेचा पोत खराब झाल्यानंतर तो सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. याशिवाय अनेक महिला सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी सतत काहींना काही करतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. हे उपाय केल्यानंतर काहीकाळ त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसू लागते. मात्र कालांतराने त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात. त्वचेला सूट न होणाऱ्या ट्रीटमेंट केल्यामुळे काहीवेळा इन्फेक्शन किंवा ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
वय वाढल्यानंतर काहीवेळा त्वचेवर सुरकुत्या येणे, पिंपल्स येणे, फोड इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बीटचे नियमित सेवन करावे. बीट खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. याशिवाय रोजच्या आहारात बीट किंवा बीटच्या रसाचे सेवन करू शकता. यामध्ये 87 टक्के पाणी असते. याशिवाय ए, बी आणि सी, लोह, मँग्नेशिअम, पोटॅशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवर चमकदार ग्लो येतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा काळवंडून जाते. काळी आणि कोरडी झालेली त्वचा उजळ्वण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. मात्र केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.बीटचा वापर त्वचेसाठी केल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल. त्वचा स्वच्छ करण्यासाठी अनेक महिला सनस्क्रिन, क्लींजिंग करताना केमिकल प्रॉडक्टचा वापर करतात. मात्र असे न करता घरगुती उपाय करून त्वचा स्वच्छ करावी.
उन्हामुळे टॅन झालेली त्वचा सुधारण्यासाठी बीटच्या रसात कच्चे दूध घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे चेहरा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल. हा उपाय नियमित केल्यास त्वचा स्वच्छ होऊन सुंदर दिसू लागेल.
पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशिअल करण्यापेक्षा घरीच तयार करा गोल्डन क्रीम, त्वचेवर येईल सोन्यासारखी चमक
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी त्वचा स्क्रब करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवरील घाण देखील स्वच्छ होते आणि त्वचा उजळदार होते. यासाठी बीटच्या रसात साखर मिक्स करून त्वचेवर लावा. त्यानंतर चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे चेहरा स्वच्छ आणि सुंदर होईल . याशिवाय त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी निघून जातील.