Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका ‘हे’ पदार्थ

पावसाळ्यात अंगाला सतत खाज येत असेल तर कडुलिंबाची पाने किंवा मीठ घालून अंघोळ करावी. यामुळे पुरळ किंवा लाल रॅश कमी होण्यास मदत होईल आणि त्वचा स्वच्छ राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 05:30 AM
अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका 'हे' पदार्थ

अंगाला सतत खाज किंवा पुरळ येते? पावसाळ्यात त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पाण्यात टाका 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडेच पाणी साचून राहते. साचून राहिलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर हानिकारक जिवाणू आणि बॅक्टरीया वाढतात. पावसात भिजून आल्यानंतर काहींना ओले कपडे घालून तसेच राहण्याची सवय असते. या चुकीच्या सवयींमुळे आजारपण वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. पावसाच्या पाण्यात भिजून आल्यामुळे किंवा साचून राहिलेल्या पाण्यात पाय भिजल्यामुळे खाज येणे, जखमा होणे, पुरळ येणे तर काहीवेळा त्वचेसंबंधित गंभीर समस्या वाढतात. बुरशीजन्य संसर्ग झाल्यानंतर त्वचेमध्ये खूप जास्त जळजळ होते. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये अतिशय सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. यामुळे त्वचेवर संसर्ग आणखीनच वाढतो.(फोटो सौजन्य – istock)

वाढत्या वयात चेहरा दिसेल तरुण! चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी तांदळाच्या पाण्यात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, सुरकुत्या होतील चमक

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीरावर जखमा किंवा पुरळ येऊन सतत खाज येऊ शकते. खाज किंवा वाढत्या पुरळपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते. त्वचेवरील ताजेपणा टिकून ठेवण्यासाठी नॅचरल पदार्थांचा वापर करावा. मात्र त्वचेवर खूप जास्त जखमा किंवा डाग, पिंपल्स वाढू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा त्वचा खराब होऊ शकते.

त्वचेवरील पुरळ घालवण्यासाठी घरगुती उपाय:

अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालून पाणी गरम करून घ्यावे. यामुळे जीवाणू, बुरशी आणि काही सूक्ष्मजंतूंविरुद्ध कार्य करणारे गुणकारी घटक असतात. पावसाळ्यात येणारी खाज, किरकोळ जळजळ आणि ओलाव्यामुळे निर्माण होणारा त्रास कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. मागील बऱ्याच वर्षांपासून कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेसाठी केला जातो. कडुलिंबाच्या पानांचा काढा किंवा अंघोळ केल्यास शरीरावर आलेली खाज कमी होण्यास मदत होते.

अंघोळीच्या गरम पाण्यात नेहमीच मीठ टाकावे. मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासोबतच घाम, धूळ आणि त्वचेवरील किरकोळ अस्वस्थता कमी करण्यासाठी जाड मीठ अंघोळीच्या पाण्यात टाकावे. पाऊस पडून गेल्यानंतर पायांना जखमा होतात. या जखमा कमी करण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाकून पाय सोडून बसावे. मात्र अतिप्रमाणात मिठाचा वापर केल्यास त्वचेमध्ये जळजळ होऊ शकते.

पायांना सतत खाज येते? नायट्यापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय, जळजळ होईल कमी

अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने टाकावीत. यामुळे दुर्गंधी आणि सतत येणाऱ्या घामापासून सुटका मिळते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेसंबंधित निर्माण झालेल्या सामान्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेला कोणतीही हानी पोहचणार नाही. वारंवार पुरळ किंवा लाल रॅश येत असतील तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do you suffer from constant itching or rashes add these ingredients to your bathwater to get relief from skin problems during the monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • monsoon care
  • skin care tips

संबंधित बातम्या

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल
1

Beauty Tips: हजारो रुपये खर्च करून सुद्धा चेहऱ्यावर चमकदार ग्लो येत नाही? मग घरीच ‘या’ पद्धतीने करा होममेड फेशिअल

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा
2

Desi Homemade Drink: कायमच तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी अभिनेत्री भाग्यश्री नियमित पिते ‘हे’ घरगुती पेय, चेहरा दिसतो देखणा

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल
3

Beauty Tips: केस सतत गळतात? मग मजबूत आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश, महिनाभरात दिसेल बदल

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!
4

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.