Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा ‘हा’ देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Home Remedy : तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्स आणि त्यानंतरचे हट्टी डाग घरं करुन बसले आहेत का? या डांगाना दूर करण्यासाठी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी टोमॅटोचा वापर खूप फायद्याचा ठरु शकतो. जाणून घ्या याचे फायदे आणि वापर करण्याची योग्य पद्धत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2026 | 08:15 PM
Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा 'हा' देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Beauty Tips : चेहऱ्यावरचे काळे हट्टी डाग अन् पिंपल्स होतील चुटकीसरशी गायब; टोमॅटोचा 'हा' देशी फॉर्म्युला करेल कमाल!

Follow Us
Follow Us:
  • टोमॅटोमधील पोषक घटक त्वचा फ्रेश आणि उजळ ठेवण्यास मदत करू शकतात.
  • टोमॅटोचा रस १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
  • पिंपल्सचे काळे डाग टाळण्यासाठी सनस्क्रीन वापरा; समस्या कायम राहिल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आजकालच्या धावपळीच्या जगात आणि अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे चेहऱ्यावर पिंपल्स, काळे डाग आणि लहान व्रण येणे फार सामान्य झाले आहे. आता पिंपल जरी आठवडाभरात ठिक होत असला तरी त्याचे डाग मात्र चेहऱ्यावरुन अनेक महिनोंमहिने जात नाहीत. या डागांमुळे चेहरा चांगला दिसत नाही ज्यामुळे लोक या डागांना दूर करण्यासाठी नवनवीन उपायांच्या शोधात असतात. बऱ्याचदा आपण हे डाग दूर करण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो पण यातील रासायनिक घटक देखील आपल्या त्वचेसाठी घातक ठरु शकतात. शिवाय, प्रत्येक महागडे प्रोडक्ट्स चेहऱ्यावरील समस्या दूर करतातच असं नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक सोपा, घरगुती आणि प्रभावी उपाय घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग सहज दूर केले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही पैसै खर्च करण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या टोमॅटोच्या पेस्टचा तुम्ही यासाठी वापर करु शकता. चला हा देसी उपाय कसा वापरावा याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Simple Home Hacks: त्वचा खूप जास्त रखरखीत आणि कोरडी झाली आहे? मग अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितलेला ‘हा’ उपाय नक्की पहा करून

टोमॅटो चेहऱ्यावर लावल्याने काय होते?

टोमॅटोत व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन आणि लायकोपीन सारखे काही पोषक घटक आढळून येतात जे आपल्या त्वचेसाठी फायद्याचे ठरतात. हे घटक त्वचेला उजळ बनवण्यास आणि त्वचा हेल्दी राखण्यास मदत करतात. हेच कारण आहे की, चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो.

त्वचा राहते फ्रेश

जर रोजच्या कामामुळे आणि ताणामुळे तुमचा चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसत असेल तर यासाठी टोमॅटोचा वापर तुमच्यासाठी फायद्याचा ठरु शकतो. यासाठी टोमॅटोचा रस एका वाटीत काढून हळूवारपणे आपल्या चेहऱ्यावर हा रस लावा. साधारण १० ते १५ मिनिटे टोमॅटोचा हा रस चेहऱ्यावर तसाच राहू द्या आणि मग फेसवाॅशने आपला चेहरा स्वच्छ धुवा.

पिंपल्ससाठी कसा वापर करावा?

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स झाले असतील तर त्यांना दूर करण्यासाठी तुम्ही टोमॅटोचा वापर करु शकता. यात आढळणारे अँटीऑक्सीडंट कंपाउंड्स त्वचेला दुरुस्त करण्यात आणि पिंपल्सना पळवून लावण्यात फायदेशीर ठरतात. यामुळेच पिंपल्स आणि तेलकट त्वचेसाठी टोमॅटोचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे.

Travel News : चालत्या ट्रेनमध्ये अलार्म चेन ओढली तर काय होतं? जाणून घ्या नियम आणि दंड

काळे डाग दूर करण्यात सनस्क्रिन ठरते मदतनीस

पिंपल निघून गेल्यानंतर चेहऱ्यावर जे डाग राहतात त्यांना पोस्ट-इन्फ्लेमेटरी हाइपरपिग्मेंटेशन असे म्हटले जाते. हे डाग हळूहळू हलके होतात ज्यात बऱ्याच महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या डागांना गडद होण्यापासून रोखण्यासाठी सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण होणे फार गरजेचे असते. अमेरिकन ॲकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीनुसार, जर तुमच्या चेहऱ्यावर मोठे आणि वेदनादायी मुरुम असतील, नवीन मुरुम पुन्हा येत असतील, किंवा मुरुम बरे झाल्यानंतर काळे डाग किंवा व्रण तयार होत असतील, तर तुम्ही केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नये. बऱ्याच काळापासून जर चेहऱ्यावरील डाग अनेक उपाय केल्यानंतरही जर दूर होत नसतील तर अशा परिस्थितीत तुम्ही डर्मेटोलॉजीस्टचा सल्ला घेऊ शकता.

Web Title: Tomato for pimples dark spots skin care home remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • skin care tips
  • tomato

संबंधित बातम्या

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम
1

Lip Care: हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे
2

Turmeric Mask: चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ पद्धतीने घरी तयार करा हळदीचा आयुर्वेदिक लेप, काळे डाग होतील नाहीसे

Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस
3

Protein: चिकन – अंड्यापेक्षा कमालीचे प्रोटीन ‘या’ पदार्थात, 100 ग्रॅममध्ये 36 ग्रॅमचा जबरदस्त डोस

Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं
4

Constipation Problem: बद्धकोष्ठतेने पोट फुगतं पण दुखत नाही? डॉक्टरांना नक्की कधी भेटावं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.