Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

कोरडे आणि फाटलले ओठ पुन्हा एकदा चमकदार आणि गुलाबी करण्यासाठी आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. आहारात विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश केल्यास ओठांचे आरोग्य चांगले राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2026 | 09:27 AM
ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

ओठ कायमच कोरडे होऊन फाटतात? मग महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी आहारात करा बदल, आठवडाभरात होतील गुलाबी ओठ

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना आपले ओठ कायमच सुंदर आणि गुलाबी हवे असतात. त्वचेच्या सौंदर्यातभर घालण्याचे काम ओठ करतात. सुंदर दिसण्यासाठी ओठांवर लिपबाम, लिपस्टिक किंवा इतर सौंदर्यप्रसाधनानांचा वापर केला जातो. आपल्यातील अनेकांना कायमच वाटते, ओठांना लिपबाम लावल्यानंतर ओठ हायड्रेट आणि ग्लोइंग राहतात, पण असे नाही. ओठांची काळजी केवळ वरून घेणे आवश्यक नसते तर शरीराला आतून पोषण दिल्यानंतर ओठ अतिशय सुंदर दिसतात. वारंवार वेगवेगळ्या ब्रँडच्या लिपस्टिक किंवा लिपबाम लावल्यामुळे ओठ काळे पडण्याची जास्त शक्यता असते. ओठ काळे पडल्यानंतर अतिशय निस्तेज दिसू लागतात. त्यामुळे ओठांना सूट होईल अशाच ब्रँडची लिपस्टिक लावावी.(फोटो सौजन्य – istock)

केसांच्या वाढीसाठी गोळ्या औषध खात असाल तर थांबा! घरगुती पद्धतीने बनवा नॅचरल बायोटीनची गोळी, नोट करून घ्या रेसिपी

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे ओठ काळे, कोरडे किंवा सुकल्यासारखे वाटतात. ओठांचा रंग, मऊपणा किंवा ओलावा कमी झाल्यानंतर ओठांचे आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे ओठांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. ओठ कोरडे पडल्यानंतर वेगवेगळ्या महागड्या प्रॉडक्टचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा ओठांमध्ये कोणताच फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओठांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे ओठांनासुद्धा भरमसाट फायदे होतील. ओठांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे.

ओठांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश:

ओठ निरोगी ठेवण्यासाठी आहारात विटामिन सी असलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. विटामिन सी शरीरासाठी फार महत्वाचे आहे. संत्री, मोसंबी, लिंबू, आवळा, पेरू आणि स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी आढळून येते. याशिवाय विटामिन सी शरीरात कोलेजन तयार करते. ज्यामुळे ओठ निरोगी आणि चमकदार राहतात. ओठांची लवचिकता कायम टिकवून ठेवण्यासाठी बदाम, सूर्यफूल बिया, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया आणि अॅव्होकॅडो यांसारख्या पदार्थांचे आहारात सेवन करावे. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. विटामिन ई असलेले पदार्थ ओठांवर वाढलेला कोरडेपणा कमी करतात.

मानेवर साचून राहिलेल्या काळ्याकुटू थरांमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास त्वचा होईल उजळदार आणि स्वच्छ

दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचे सेवन करावे. हिरव्या पालेभाज्या, फळ भाज्या, फळे इत्यादी पदार्थ शरीरात ओलावा कायम टिकवून ठेवतात. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्यास ओठांचा रंग फिका किंवा काळा पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आहारात लोह असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. दूध, दही, पनीर आणि कडधान्यांमधील प्रथिने त्वचेच्या पेशी दुरुस्त करतात. सुकामेवा आणि अळशी, चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात आढळून येते. यामुळे ओठांचे आरोग्य चांगले राहते. आहारात बदल केल्यास आठवडाभरात ओठ गुलाबी आणि सुंदर दिसतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Do your lips constantly get dry and chapped instead of using expensive products make changes to your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • Healthy Foods
  • home remedies
  • lip care tips

संबंधित बातम्या

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल
1

Hibiscus Flower For Face: काळवंडलेला-निस्तेज चेहरा आठवडाभरात दिसेल तेजस्वी! ‘या’ पद्धतीने तयार करा जास्वदींच्या फुलांचे नॅचरल जेल

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब
2

Skin Care Tips: त्वचेवर अचानक पिंपल्स येऊन खड्डे पडतात? ‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे चेहऱ्यावर चमक होते कायमची गायब

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार
3

Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Beauty Shot! महिनाभरात त्वचेमध्ये दिसून येतील सकारात्मक बदल, चेहरा होईल उजळदार

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा
4

Fridge Water Leakage: फ्रीजमधून सतत पाणी गळतंय? मेकॅनिकला बोलावण्यापूर्वी ‘हे’ सोपे उपाय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.