
हिवाळ्यात तळहातांची साल निघतात? 'हे' सोपे उपाय करून मिळवा कायमचा आराम
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडणे, केस कोरडे होणे, सर्दी खोकला, साथीच्या आजारांचीव लागण इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवून आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे थंडीत आरोग्यासह त्वचा आणि केसांची खूप जास्त काळजी घ्यावी. वाढत्या प्रदूषणामुळे त्वचेच्या असंख्य समस्या उद्भवू लागतात. हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर काहींच्या हातापायांची स्किन अचानक निघून येते. तळव्यांची त्वचा निघण्यास सुरुवात झाल्यानंतर काहीवेळा रक्त सुद्धा येते. याशिवाय अंगावरील त्वचा पांढरी पडल्यामुळे स्लीव्हलेस ड्रेस घालताना खूप जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीच्या दिवसांमध्ये तळहातांची किंवा तळपायांची त्वचा निघून येत असेल तर कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तळहातांची होणारी जळजळ कमी होईल. (फोटो सौजन्य – istock)
वयाआधीच केस पांढरे होऊ लागलेत? महागडे प्रोडक्ट्स नाही, तुमच्या ‘या’ सवयी दाखवतील चमत्कार
त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी ग्लिसरीनचा वापर केला जातो. हा एक चिकट पदार्थ आहे. याची चव गोडसर असते. तसेच केमिकलयुक्त ग्लिसरीनमध्ये ट्राय हायड्रोक्सी शुगर अल्कोहोल आढळून येते. यामुळे खराब झालेली त्वचा सुधारते आणि त्वचेची गुणवत्ता सुधारून त्वचा मुलायम होते. पण ग्लिसरीन थेट त्वचेवर लावू नये. यामुळे लाल रॅश किंवा त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे ग्लिसरीनचा वापर करताना तेल किंवा कोणत्याही जेल मध्ये मिक्स करून लावावे.
थंडीच्या दिवसांमध्ये काहींची त्वचा खूप जास्त कोरडी पडते. कितीही स्किन केअर, स्किन ट्रीटमेंट करून सुद्धा त्वचा कोरडी वाटते. अशावेळी बाजारात उपलब्ध असलेल्या थिक मॉइश्चरायजरचा वापर करावा. यामुळे त्वचेवर थिक मॉइश्चरायजरचा एक जाड लेअर बसतो. तेलकट त्वचा असलेले कायमच थिक मॉइश्चरायजर वापरतात. क्रीमी लोशन फार लवकर त्वचेवरून निघून जाते. त्यामुळे थिक मॉइश्चरायजरचा वापर करावा. यामुळे थंडीत सुद्धा तुमची त्वचा हायड्रेट राहील.
शरीर हायड्रेट आणि निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दिवसभरात कमीत कमी ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या सेवनासोबत नेहमीच कोणत्या ना कोणत्या फळांचा ताजा रस, नारळ पाणी, ताक प्यायल्यास शरीर हायड्रेट राहण्यासोबतच चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. अंगात वाढलेल्या उष्णतेमुळे हातापायांची त्वचा निघून येते.
अतिशय कोरडी त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर आठवड्यातून दोनदा तेल लावावे. तेलामुळे त्वचा मॉइश्चरायज आणि मुलायम राहते. चेहऱ्यावर वाढलेला ड्रायनेस कमी करण्यासाठी स्किन केअर रुटीन व्यवस्थित फॉलो करावे.