(फोटो सौजन्य – X)
निरोगी आहार
आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या केसांवर होत असतो. आपल्या आहारात थिने, लोह, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक ॲसिड आणि हिरव्या भाज्या, अंकुरलेले धान्य, सुकामेवा आणि फळे यांसारख्या अँटीऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचे सेवन करा.
केसांना तेल लावा
केसांना पोषण मिळवून देण्यात तेल मोठी जबाबदारी बजावते. तेलाने केलेली मसाज टाळूला कोरडे पडू देत नाही आणि तेलातील पोषक घटक मुलांमध्ये रुजून केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. आठवड्यातून किमान दोनदा तुम्ही नारळ, बदाम अथवा आवळ्याच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करायला हवी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते.
केमिकलयुक्त पदार्थांचा वापर टाळा
केस पांढरे होऊ लागली की बहुतेकजण यावर बाजारातील रासायनिक कलरचा वापर करून त्यांना काळा रंग देतात. हा रंग काही दिवसांतच निघून जातो खरा पण यामुळे केसांचे मोठे नुकसान होऊ लागते. केसांवर केला जाणारा रंगांचा वापर केसांना हळूहळू निर्जीव बनवतो, त्यामुळे केस कलर करण्यासाठी नैसर्गिक पर्यायांची निवड करा जसे की मेहंदी.
केसांचे संरक्षण महत्त्वाचे
आपण जेव्हा बाहेर पडतो तेव्हा केसांना स्टाईल करून त्यांना मोकळे केस फ्लॉन्ट करू पाहतो पण तुमची हीच सवय केसांचे आरोग्य खराब करत असते. प्रदूषण आणि अतिनील किरणांमुळे केस अकाली पांढरे होऊ शकतात. घराबाहेर पडल्यानंतर केसांना स्कार्फ किंवा टोपीने झाकावे.
पुरेशी झोप घ्या.
झोपेची कमतरता देखील केसांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. याचा केसांवर नकारात्मक परिणाम होतो आणि हळूहळू केस खराब होऊ लागतात. दररोज किमान ७-८ तास झोप घेणे गरजेचे आहे.
ताण व्यवस्थापित करा
बऱ्याचदा तणावामुळेही केस जलद गतीने गळू लागतात. योग, ध्यान आणि प्राणायाम करून मानसिक ताण कमी करत येतो. रोजच्या जीवनात ते केल्याने केसांची वाढ सामान्य राहील.
आवळ्याचे सेवन करा
आवळा व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. याचे नियमित सेवन केसांच्या निरोगी आरोग्यास फायद्याचे ठरते. तुम्ही आवळ्याचा रस अथवा च्यवनप्राश बनवून त्याचे सेवन करू शकता. याव्यतिरिक्त, आवळ्याच्या तुकड्यांना हळद-मिठाच्या पाण्यात उकडून देखील आठवडाभर साठवून ठेवता येते. रोज यातील काही तुकड्यांचे तुम्ही सेवन करू शकता.
केस धुण्याच्या योग्य सवयी
बऱ्याचदा केसांना स्वछ करण्यासाठी महिला केसांना भरपूर शॅम्पू लावू पाहतात पण ही सवय चुकीची आहे. जास्त शॅम्पू आणि गरम पाण्याने केसांची मुळे कमकुवत होतात. याऐवजी २-३ वेळा सौम्य हर्बल शॅम्पूने केस धुवा.
पांढरे केस तोडू नका
सामान्यपणे केस पांढरी झाली की त्यांना काढून टाकण्याची पहिली कल्पना आपल्या मनात येते. पण हे चुकीचे आहे, केस उपटून काढल्यामुळे केसांच्या मुळांचे नुकसान होते आणि उरलेले केस देखील पांढरे होऊ लागतात.
हर्बल हेअर पॅक लावा
आठवड्यातून एकदा भृंगराज, मेंदी, आवळा आणि रीठापासून बनवलेला हेअर पॅक लावल्याने तुमच्या केसांची नैसर्गिक चमक आणि रंग टिकून राहण्यास मदत होते. रोजच्या या जीवनात या सवयींचे पालन केल्याने फक्त केस काळी राहत नाहीत तर यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहते.






