Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील ‘हे’ पदार्थ ठरतील अमृत

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीराला साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता असते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे दैनंदिन आहारात या पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2026 | 08:04 AM
वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ ठरतील अमृत

वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते? इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'हे' पदार्थ ठरतील अमृत

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात कोणत्या आजारांची लागण होते?
साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपाय?
स्वयंपाक घरातील कोणते पदार्थ शरीरासाठी अमृत?

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्य काहीसे बिघडण्याची शक्यता असते. उन्हाळा ऋतू संपल्यानंतर पावसाळ्याचे आगमन होते आणि वाढत्या उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळतो. सगळीकडे गारवा निर्माण झाल्यानंतर खूप आनंद वाटतो, पण याच दिवसांमध्ये शरीराला गंभीर आजारांची लागण होण्याची खूप जास्त श्यक्यता असते. व्हायरल इन्फेक्शन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार आणि हंगामी फ्लूच्या साथींमध्ये अचानक वाढ होते आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीराला संसर्गजन्य आजारांची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळयात शरीराची खूप जास्त काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच

वातावरणात सतत होणारे बदल, बिघडलेली हवेची गुणवत्ता, हवेचा दर्जा यामध्ये सतत चढ-उतार होत असतात, ज्यामुळे गंभीर आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढून शरीराचे नुकसान करतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विकतचे अन्नपदार्थ अजिबात खाऊ नये. आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि शरीर कायमच निरोगी ठेवतात. कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात कायमच पौष्टिक पदार्थ खावेत.

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • आजारातून बरे होण्यास जास्त वेळ लागणे.
  • जखमा लवकर बऱ्या न होणे.
  • वारंवार पोटाचे विकार.
  • ठराविक दिवसानंतर सतत ताप येणे.

विटामिन आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त संतुलित आहार:

वर्षाच्या बाराही महिने संतुलित आणि शरीरास आवश्यक असलेले पोषक आहार घेणे फार आवश्यक आहे, अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. संत्री, मोसंबी, पेरू, आवळा, किवी आणि वेगवेगळ्या बेरीज इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी असते. तर हिरव्या पालेभाज्या, गाजर, लाल भोपळा, टोमॅटो आणि शिमला मिरची या भाज्यांमध्ये शरीरास आवश्यक असलेले सर्व अँटीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या, फळे इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. आहारात डाळी, कडधान्ये, अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि चिकनचा समावेश रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच लाल रक्त पेशी वाढू लागतात.

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

पारंपरिक पदार्थांचे सेवन:

स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ असतात. हळद, तुळशी, आलं, काळीमिरी, धणे, दालचिनी इत्यादी पदार्थांचे एकत्र पाणी तयार करून प्यावे. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यात दाहक-विरोधी आणि आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळतात. आल्याच्या सेवनामुळे घशात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रिया सुधारून शरीरातील घाण बाहेर पडून जाते. आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाळण्यासाठी वेगवेगळ्या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वातावरणातील बदलांमुळे रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो का?

    Ans: होय. ऋतू बदल, तापमानातील चढ-उतार आणि आर्द्रतेतील बदल यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता काही प्रमाणात प्रभावित होऊ शकते.

  • Que: इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाकघरातील कोणते पदार्थ उपयुक्त ठरू शकतात?

    Ans: हळद, आले, लसूण, काळी मिरी, दालचिनी आणि तुळस यांसारखे पदार्थ रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करू शकतात.

  • Que: वारंवार संसर्ग होण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: अपुरी झोप, तणाव, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती ही वारंवार संसर्ग होण्यामागील सामान्य कारणे

Web Title: Does a change in weather weaken immunity these kitchen ingredients will prove to be like nectar in protecting against infections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:04 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • infections
  • monsoon care

संबंधित बातम्या

Reels Addiction: दिवसभर रील्स पाहण्याची सवय आहे? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स
1

Reels Addiction: दिवसभर रील्स पाहण्याची सवय आहे? आरोग्यावर होतात गंभीर परिणाम, जाणून घ्या ‘हे’ साइड इफेक्ट्स

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे
2

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच
3

Cooking Oil: कोणते कुकिंग ऑईल्स आरोग्यासाठी ठरत आहेत धोकादायक? सत्य वाचाच

Men’s Health: चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांसाठी धोक्याची घंटा! ‘या’ गंभीर आजाराचा वाढतो धोका; अशी घ्या काळजी
4

Men’s Health: चाळीशी ओलांडलेल्या पुरुषांसाठी धोक्याची घंटा! ‘या’ गंभीर आजाराचा वाढतो धोका; अशी घ्या काळजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.