
ॲसिडिटीमुळे सतत करपट ढेकर- जळजळ होते? जेवणानंतर 'या' बारीक दाण्यांच्या मिश्रणाचे सेवन करून मिळवा आराम
जीवनशैलीतील बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. सतत तिखट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पित्त वाढते आणि ॲसिडिटी होते. शरीरात वाढलेली ॲसिडिटी संपूर्ण आरोग्यावर परिणाम करते. त्यामुळे कायमच संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीची जीवनशैली, अपुरी झोप, कामाचा वाढलेला तणाव, मानसिक तणाव, शारीरिक हालचालींची कमतरता इत्यादींमुळे शरीरात विषारी घटक तसेच साचून राहतात. खाल्ले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन न झाल्यामुळे आंबट ढेकर येणे, सतत उलट्या, मळमळ, डोकेदुखी इत्यादी गंभीर समस्या वाढू लागतात.(फोटो सौजन्य – istock)
ॲसिडिटी झाल्यानंतर डोकेदुखीमुळे तीव्र वेदना होतात. हा त्रास ॲसिडिटी झालेली व्यक्तीच शकते. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून न गेल्यास पोटात जडपणा जाणवणे, पोटात वेदना होणे, आतड्यांमध्ये वेदना इत्यादी समस्या उद्भवून शरीराचे कार्य बिघडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी कोणत्या बारीक दाण्यांच्या मिश्रणाचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
भारतीय स्वयंपाक घरात अनेक वेगवेगळे पदार्थ उपलब्ध असतात. ॲसिडिटी झाल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या औषधांचे सेवन करतात. पण असे न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा. नैसर्गिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पचन सुधारण्यासाठी आणि ॲसिडिटीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खडीसाखर आणि बडीशेप एकत्र मिक्स करून खावी. नियमित हे मिश्रण खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतील. बडीशेप आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होते. गॅस, आंबट ढेकर कमी करण्यास मदत होते. ॲसिडिटी वाढल्यामुळे शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी करण्यासाठी बडीशेप खावी. यामध्ये असलेले एनेथोल घटक सूज आणि गॅस कमी करते.
जेवणानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखे वाटत नाही. जेवणानंतर नियमित अर्धा चमचा बडीशेप खाल्ल्यास खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. यासोबतच तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. जेवणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे वारंवार पोटात वेदना वाढू लागतात. या वेदना वाढू लागल्यानंतर काहीवेळा शरीरात अस्वस्थपणा वाटू लागतो. तसेच तुम्ही बडीशेपचे पाणी सुद्धा पिऊ शकता. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होते.
डायबिटीजला 2 स्टेप्समध्येच करा रिव्हर्स, सायलेंट किलरपासून वाचण्यासाठी एक्सपर्टने सांगितले उपाय
बडीशेपमध्ये नैसर्गिक तेल मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी होते आणि शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. खडीसाखर खाल्ल्यामुळे नैसर्गिकरित्या कार्बोहायड्रेट पुरवतात. पचनमार्गाच्या स्नायूंना आराम देण्यासाठी नियमित खडीसाखर खावी. बडीशेप आणि खडीसाखरचे मिश्रण खाल्ल्यास खाल्ले अन्नपदार्थ पोटात जास्त वेळ टिकून न राहता पुढे सरकतात.
Ans: पोटात आणि छातीत जळजळ होणे, घशात जळजळ होणे, अस्वस्थ वाटणे, मळमळ
Ans: एका चमच्या बेकिंग सोडा कोमट पाण्यात मिसळून प्यायल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो.
Ans: आहारात फायबरची कमतरता. पुरेसे पाणी न पिणे. व्यायामाचा अभाव. आहाराच्या किंवा दिनचर्येत अचानक बदल.