जीवघेण्या कॅन्सरपासून राहा चार हात लांब! Stanford डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' पदार्थांचे नियमित सेवन केल्यास शरीराला होतील फायदे
जगभरात कॅन्सरच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. या गंभीर आजाराचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या पायाखालील जमीन सरकते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच निरोगी राहणे आवश्यक आहे. जीवनशैलीत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. आहारात होणारे बदल, जंक फूडचे अतिसेवन, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता, शारीरिक हालचालींचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. लठ्ठपणा, मधुमेह, फॅटी लिव्हर, हार्मोनल बिघाड आणि अनुवांशिक बदल यांसारख्या गोष्टी कॅन्सरला कारणीभूत ठरतात. शरीरात कॅन्सरच्या अनियंत्रित पेशी वाढू नये म्हणून स्टॅनफोर्ड आणि हार्वर्ड-प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलेल्या या पदार्थांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि कॅन्सर तुमच्यापासून कायमचा लांब राहतो.(फोटो सौजन्य – istock)
डायबिटीजला 2 स्टेप्समध्येच करा रिव्हर्स, सायलेंट किलरपासून वाचण्यासाठी एक्सपर्टने सांगितले उपाय
कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. त्यामुळे संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैली कायमच फॉलो करणे आवश्यक आहे. कॅन्सरचा धोका केवळ अनुवांशिक घटकांवर नाहीतर दैनंदिन सवयींवर सुद्धा अवलंबून असतो. त्यामुळे दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि शारीरिक हालचाली करणे आवश्यक ठरते. कायमच सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटं व्यायाम, योगासने, प्राणायाम केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील.
रोजच्या आहारात ताज्या भाज्या, फळे, सुका मेवा, बिया आणि संपूर्ण धान्ये इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. तसेच आहारातून लाल मांस, जास्त तळलेले पदार्थ, कृत्रिम गोड पदार्थ आणि कार्बोनेटेड पेयांचे अतिप्रमाणात सेवन करू नये. यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. या पदार्थांमध्ये असलेले विषारी घटक शरीरात प्रवेश करतात आणि संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते.भरपूर पाणी, नियमित व्यायाम, झोप आणि ताणतणाव नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहते.
भारतासह जगभरात लोकप्रिय असलेली भाजी म्हणजे ब्रोकोली. ब्रोकोलीचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लहान मुलांच्या नाश्त्यात किंवा जेवणात त्यांना उकडलेली ब्रोकोली खाण्यास द्यावी. यामध्ये सल्फोराफेन नावाचे कर्करोगविरोधी गुणधर्म आढळून येते, ज्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. शरीरात वाढलेली जळजळ नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रोकोलीचे सेवन करावे.
जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना लसूणचा वापर केला जातो. लसूण जेवणात टाकल्यास पदार्थाची चव वाढण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. लसूणमध्ये कॅन्सर विरोधी अनेक गुणकारी घटक आढळून येतात. यामध्ये असलेले अॅलिसिन नावाचे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकते आणि पेशी निरोगी ठेवण्यास मदत करते.सकाळी उठल्यानंतर तुपात भाजलेला एक लसूण नियमित चावून खावा.
Ans: कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यात पेशी अनियंत्रितपणे वाढतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. याला "बांडगुळ" किंवा "उद्यम" असेही म्हटले जाते.
Ans: डीएनएमधील बदलांमुळे कर्करोग होतो, जे अनुवांशिक किंवा पर्यावरणाशी संबंधित असू शकतात.
Ans: शरीरात त्वचेखाली किंवा शरीरामध्ये गाठ किंवा कठीण भाग निर्माण झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण ती कर्करोगाची सुरुवात असू शकते.






