(फोटो सौजन्य: istock)
मधुमेह हा आजार जगभरात वाढत चाललेला एक धोकादायक आणि गंभीर आजार आहे. मागील काही काळापासून फक्त वयोवृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आला आहे. WHO च्या अहवालानुसार, उच्च रक्तातील साखरेने ग्रस्त लोकांची संख्या १९९० मध्ये २० कोटी होती ती २०२२ मध्ये ८३ कोटी झाली आहे. मधुमेह हा भारतात एक गंभीर सार्वजनिक आरोग्य आव्हान आहे. देशात अंदाजे ७७ दशलक्ष लोक मधुमेही आहेत आणि २५ दशलक्ष प्री-डायबेटिक आहेत. भारतात मधुमेह रुग्णांची संख्या फार जास्त असून या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे.
हिवाळ्यात भासणार नाही महागड्या स्किन केअर प्रॉडक्टची गरज, ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा कोरफड जेल
अनेकांना हे ठाऊक नाही पण तुम्ही डायबिटीजसारख्या आजाराला रिव्हर्स देखील करू शकता. मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे जाणून घेतल्यास यावर योग्य ते उपचार वेळेत घेण्यास मदत होते. चला मधुमेहाचा आजार रिव्हर्स करायचा असल्यास काय करावे ते जाणून घेऊया.
मधुमेह काय आहे?
मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यात शरीरातील रक्ताची पातळी लक्षणीयरित्या वाढली जाते. यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होत नाही. जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि ते रक्तात मिसळते. इन्सुलिन हे ग्लुकोजला पेशींपर्यंत पोहोचवण्याचे काम करते, जेथे त्याचे ऊर्जेमध्ये रूपांतर होते. मधुमेहात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, त्यामुळे ग्लुकोज रक्तातच जमा होऊ लागते.
मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे
बऱ्याचदा मधुमेहाची लक्षणे सुरुवातीला सौम्य दिसत असतात जी पटकन ओळखता येत नाही. यामुळेच अनेकजण आजार वाढल्यानंतर त्याचे निदान करायला जातात. लवकर निदान केल्याने मधुमेहाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण करणे सोपे होते. टाइप २ मधुमेह सामान्यतः सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दर्शवत नाही, ज्यामुळे गुंतागुंत निर्माण होईपर्यंत तो शोधणे कठीण होते. पण काही लक्षणांना ओळखून मधुमेहाचे लवकरत लवकर निदान करता येऊ शकते.
मधुमेह कसा उलटवायचा?
प्रसिद्ध पोषणतज्ञ रमिता कौर यांनी एका पोस्टमध्ये सायलेंट किलर, मधुमेह, बरा करण्यासाठी दोन सोप्या स्टेप्स शेअर केल्या आहेत. जर तुम्ही हे तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवले तर उच्च रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करणे सोपे होईल.
नाश्त्याच्या वेळेची काळजी घ्या
पोषणतज्ञ सांगतात की, नाश्त्याची चुकीची वेळ ही याचे मुख्य कारण ठरू शकते. संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान जास्त भूक लागते तेव्हा तुम्ही अरबट-चरबट न खाता काही तरी हेल्दी खाण्याचा पर्याय निवडा. यामध्ये भाजलेले चणे, कुरमुरे, मखाना, खाकरा अशा हेल्दी स्नॅक्सचा समावेश केला जाऊ शकतो. तुम्ही अंकुरलेले सॅलड, भाजलेले काळे चणे, मसालेदार टोफू/पनीर, हम्मससह भाज्या, ग्वाकामोल, नट बटरसह फळे, बियांचे मिश्रण किंवा सूप देखील खाऊ शकता. हे अतिरिक्त कॅलरीज आणि साखरेच्या वाढीशिवाय तुमची इच्छा पूर्ण करू शकतात, ज्यामुळे तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करणे सोपे होते.
प्रथिने घ्या
मधुमेह बरा करण्यासाठी, प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश असणे अनिवार्य आहे. हे रक्तातील साखर स्थिर करण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, तुमचे जेवणात भाज्यांचा आणि सॅलडचा समावेश करायला सुरुवात करा. तुमच्या दह्यात जवस पावडर घालून याचेही सेवन करू शकता. या सर्व गोष्टी तुमचा मधुमेह बरा करण्यास मदत करतील आणि तुमचे आरोग्य सुधारतील.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






