
थंडीच्या दिवसांमध्ये अंगाला सतत खाज येते? मग 'या' पदार्थांच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या होतील कायमच्या दूर
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवू लागतात. त्वचा पांढरी होणे, पिंपल्स, ऍक्ने, केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, मान, हातापायांना खूप जास्त खाज येते. अंगाला आलेली खाज कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लोशनचा वापर करतात. मात्र तरीसुद्धा कोणताच बदल दिसून येत नाही. अंगाला किंवा शरीराच्या कोणत्याही अवयवाला खाज आल्यानंतर त्वचा लाल होणे, रॅश येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंगाला वारंवार येणारी खाज कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्वचेवर वाढलेली खाज कमी करण्यासाठी कायमच घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा कायमच स्वच्छ राहते आणि खाज येण्यापासून सुटका मिळते.(फोटो सौजन्य – istock)
वयाच्या ३७ व्या वर्षी Virat Kohli दिसतो तरुण खेळाडूसारखा! जाणून घ्या विराटचा आहार आणि फिटनेसचे रहस्य
मोहरीच्या तेलाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी झाल्यानंतर बॉडी लोशन किंवा इतर वेगवेगळ्या क्रीम लावल्या जातात. पण त्याऐवजी मोहरीच्या तेलाचा वापर करावा. अंघोळीला जाण्याआधी संपूर्ण शरीरावर मोहरीचे तेल लावून हाताने हलकासा मसाज करावा. त्यानंतर १५ मिनिटं तसेच ठेवून पाण्याने अंघोळ करा. यामुळे कोरडी झालेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर होईल. मोहरीच्या तेलातील गुणधर्मांमुळे त्वचा खूप जास्त मुलायम होते.
कडुलिंबाच्या पानांचा वापर संपूर्ण शरीरासाठी केला जातो. मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि आरोग्यासंबंधित बऱ्याच वेगवेगळ्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर केला जातो. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालून पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. त्यानंतर पाण्याने अंघोळ केल्यास शरीरावर जमा झालेली घाण स्वच्छ होण्यासोबतच दुर्गंधी आणि त्वचेच्या इतर समस्यांपासून सुटका मिळेल. यासाठी वाटीभर दह्यात कडुलिंबाच्या पानांची पेस्ट मिक्स करून खाज येत असलेल्या अवयवावर लावल्यास इन्फेक्शनचा धोका कमी होईल.
लिंबाचा वापर अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. प्रत्येक घरात सहज लिंबू उपलब्ध होतो. लिंबामध्ये अॅसिडिक आणि सिट्रिक अॅसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. अंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून अंघोळ केल्यास शरीरावरील घाण स्वच्छ होईल आणि त्वचेवर वाढलेली जळजळ कमी होईल. याशिवाय अंघोळीच्या पाण्यात तुळशीची पाने आणि लिंबाचा रस मिक्स करून अंघोळ केल्यास त्वचेवरील इन्फेक्शन कमी होईल.