थंडीमुळे त्वचा खूप जास्त कोरडी पडली आहे? मग चमचाभर तुपाचा 'या' पद्धतीने करा वापर
वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधरण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. थंड वातावरणात त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो आणि त्वचा सुकल्यासारखी निस्तेज दिसू लागते. रखरखीत, ओढल्यासारखी त्वचा झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करून त्वचेची गुणवत्ता सुधारतात. पण वारंवार क्रीम्स, सीरम, नाईट क्रीम्स लावल्यामुळे त्वचेमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. काहीवेळा त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. थंडीत चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)
चेहऱ्यावर हवा आहे पार्लरसारखा ग्लो? मग २० रुपयांच्या पपईचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल चमकदार
त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी तुपाचा वापर करावा. आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेले तूप त्वचा अधिक सुंदर आणि उजळदार करते. थंडीत त्वचेला बाहेर पोषण देण्यापेक्षा आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. तुपामध्ये जीवनसत्त्वे ए, डी, ई, ओमेगा-३ आणि ओमेगा-९ फॅटी ऍसिड इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळी उठल्यानंतर चमचाभर तुपाचे सेवन केल्यास शरीर आतून हायड्रेट राहते आणि त्वचेच्या समस्येंपासून आराम मिळतो. त्वचेला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी तुपाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला चमचाभर तुपाचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
थंडीच्या दिवसांमध्ये कोरडी पडलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी तुपाचा वापर करावा. तुपामध्ये असलेले गुणकारी घटक त्वचा आतून हायड्रेट आणि सुंदर ठेवतात. याशिवाय त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी तूप फायदेशीर आहे. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी नाईट क्रीम म्हणून तुपाचा वापर करावा. तूप चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्याने त्वचा व्यवस्थित कोरडी करा. त्यानंतर हातांवर तूप घेऊन त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल आणि त्वचा अतिशय चमकदार होईल. याशिवाय त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चमचाभर तूप नियमित सेवन करावे.
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा हलक्या हाताने मसाज करणे अतिशय महत्वाचे आहे. यामुळे थंडीत आकुंचन पावलेल्या नसा मोकळ्या होतील. तसेच तेलकट त्वचा असलेल्या महिलांनी चेहऱ्यावर तूप लावू नये. तूप त्वचेवर लावण्याऐवजी चमचाभर तुपाचे सेवन करावे. वेदनशील, ड्राय, पिग्मेंटेशन, डार्क सर्कल आणि एजिंग स्किन तूप वरदान मानले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती आणि आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुपाचा वापर करावा.






