फोटो सौजन्य - Social Media
अनेकदा असे म्हंटले जाते की श्वानांना भुतं दिसतात. त्यांना त्यांची अनुभूती होते. ते त्या नकारत्मक ऊर्जा डोळ्यांनी अगदी पाहू शकतात. पण हे फक्त झालं, कानावर पडलेल्या गोष्टी! पण विज्ञान असे म्हणत नाही. विज्ञान म्हणते की श्वानामध्ये असणारे सेन्स करण्याचे अवयव मानवापेक्षा अधिक प्रभावी आहे. अंधारामध्ये असणाऱ्या गोष्टी ते अधिक स्पष्ट स्वरूपात पाहू शकतात. गोष्टी अधिक स्पष्ट ऐकू शकतात. अशाही गोष्टी ऐकू शकतात, जे मानवी कानांना ऐकता येत नाही. त्यामुळे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की ते पाहण्या आणि ऐकण्यामध्ये मानवाच्या अनेक पाउलांनी पुढे आहेत. या गोष्टी त्याला मानवापेक्षा वेगळं करतात आणि त्यामुळे मानवाला नेहमी वाटत असते की त्याला भुतं आणि आत्मा अशा गोष्टी दिसतात.
वरील बाजू झाली विज्ञानाची बाजू! पण काही पॅरानॉर्मल एक्सपर्टस यांचे असे म्हणणे आहे की श्वान त्या जगातील गोष्टी जसे की प्रेत, आत्मा आणि भुतं, या गोष्टी आरामात पाहू शकतो. त्यांच्याकडे तो गुणधर्म आहे. पण हे जग विज्ञानावर चालणारे असल्यामुळे, या गोष्टींना मानणे योग्य ठरणार नाही. पण या गोष्टींना दुर्लक्ष करूनही चालणार नाही. दिवसा माणसं फार असतात, रात्री त्यामानाने फारच कमी असतात.
अशावेळी श्वान फक्त रात्रीच्या वेळीच का जास्त भुंकत असतात? दिवसा त्या मानाने का कमी भुंकतात? असा एक प्रश्न समोर येतो. पण यावर एक महत्वाची माहिती समोर येते की, मानवी कान रात्रीच्या शांततेत येणाऱ्या आवाजांना जास्त प्रतिसाद देत असेल, याला कारणीभूत मनातील भीती आणि विचारही असू शकतात.
एकंदरीत, श्वान दिवसा उजेडातही तितकंच भुंकतात, जितके रात्री! पण रात्रीच्या अंधारात मनात असणारी भीती त्या आवाजावर जास्त लक्ष देऊन विचार करण्यास भाग पाडते. पण दिवसा मनात असे काही विचार नसल्याने या गोष्टीकडे आपण फार काही लक्षच देत नाही.