दरवर्षी लाखो पर्यटक कोकण फिरण्यासाठी येतात. कोकणच्या सौंदर्याने साऱ्यांचा भूल घालती आहे, कोकण समुद्र किनारे, देवस्थान, खाद्यपदार्थसाठी फेमस आहे. कोकणात आल्यानंतर पर्यटक मासे खाण्यास जास्त प्राधान्य देतात. ताज्या माशांची चव सगळ्यांच खूप जास्त आवडते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणातील काही प्राचीन मंदिरे आणि समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यानंतर पुन्हा घरी जाण्याची इच्छा होणारच नाही. समुद्रकिनारी असलेली वाळू आणि पाण्याचा खळखळाट मन प्रसन्न करून टाकतो. (फोटो सौजन्य – istock)
कोकणात फिरायला गेल्यानंतर 'या' समुद्रकिनाऱ्यांना आवर्जून द्या भेट
कोकणात फिरायला गेल्यानंतर मालवणजवळील शांत सुंदर आणि गर्दीपासून लांब पांढऱ्या वाळूच्या भोगवे समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या. हे ठिकाण देवबाग जवळ आहे.
प्राचीन काळातील वेंगुर्ला-शिरोडा मार्गावर असलेले रेड्डी गणपती मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. मंदिराला लागूनच नयनरम्य समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे.
वेंगुर्ल्याजवळ लपलेला स्वर्ग खडकाळ डोंगररांगा, निळाशार समुद्र आणि स्वच्छ समुद्र किनारा असलेल्या निवती बीचला नक्की भेट द्या. हा समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आहे.
देवगडजवळ समुद्रकाठावर असलेले प्राचीन कणकदुर्गा देवी मंदिर कोकणात प्रसिद्ध आहे. हे कोकणातील एक जागृत देवस्थान आहे. कणकदुर्गा देवी मंदिर देवगडपासून अतिशय जवळ आहे.
कोकणातील शांत समुद्रकिनाऱ्याला भेट द्याची असेल तर तुम्ही वेंगुर्ल्याजवळील शिरोडा बीचला जाऊ शकता. समुद्रकिनाऱ्यावर असलेली ‘टेंब’ नावाची नैसर्गिक खडक प्रसिद्ध आहे.