Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करायला जास्त वेळ मिळत नाही? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा मसूर डाळ, चेहऱ्यावर येईल ग्लो

चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन घालवण्यासाठी मसूर डाळ या पद्धतीने चेहऱ्यावर लावावी. यामुळे तुम्हाला फेशिअल किंवा क्लीनअप करण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नाही. जाणून घ्या मसूर डाळ वापरण्याची पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 08:26 AM
पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करायला जास्त वेळ मिळत नाही? मग 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मसूर डाळ, चेहऱ्यावर येईल ग्लो

पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करायला जास्त वेळ मिळत नाही? मग 'या' पद्धतीने चेहऱ्यावर लावा मसूर डाळ, चेहऱ्यावर येईल ग्लो

Follow Us
Follow Us:

घरात कोणताही कार्यक्रम असल्यास किंवा लग्नाच्या काही दिवस आधी सर्वच महिला पार्लरमध्ये जाऊन फेशिअल करतात. फ्रुट फेशिअल तर कधी हायड्रा फेशिअल करून त्वचेवर जमा झालेली डेड स्किन, धूळ, माती, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स काढले जातात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे वेळ लगेच निघून जातो. उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स तर काहीवेळा तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची जास्त शक्यता असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर पार्लरमध्ये जाऊन फेशिअल, वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट तर काहीवेळा आयव्ही सुद्धा घेतल्या जातात. यामुळे काही काळापुरता चेहऱ्यावर चमकदार ग्लो येतो आणि कालांतराने पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते.(फोटो सौजन्य – istock)

मानेवरील काळेपणाने त्रासलात? आजच या 5 घरगुती ट्रिक्सची मदत घ्या, वर्षांनुवर्षांची टॅनिंग होईल दूर

वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन चेहऱ्यावरील चमक नाहीशी होऊन जाते आणि चेहरा अतिशय डल दिसतो. फेशियल, क्लिनअप केल्यानंतर काही दिवसांपुरता ग्लो चेहऱ्यावर टिकून राहतो, मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी फेशिअल न करता मसूर डाळीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मसूर डाळ चेहऱ्यावर लावल्यामुळे कमी वेळात चेहरा तुमचा चमकदार दिसेल. यामुळे तुम्हाला फेशिअल किंवा क्लीनअप करण्याची कोणतीही आवश्यकता भासणार नाही.

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी करा मसूर डाळीचा वापर:

कडाक्याच्या उन्हात काहीवेळ बाहेर फिरून आल्यानंतर त्वचा खूप जास्त टॅन होऊन जाते. चेहऱ्यावर मोठे मोठे फोड आणि मुरूम सुद्धा येतात. यासाठी मिक्सरच्या भांड्यात दोन ते तीन चमचे मसूर डाळ घेऊन त्यांची बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. वाटीमध्ये तयार केलेली मसूर डाळ पावडर, मुलतानी माती आणि तांदळाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात जेष्ठमध पावडर घालून मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात हळद, मध आणि खोबरेल तेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या.

Skin Care Tips: ग्लोइंग स्किनचे रहस्य तुमच्या किचनमध्ये; आहारात करा ‘या’ सुपरहेल्दी सीड्सचा समावेश

मसाज केल्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यासोबतच त्वचा उजळदार होण्यास मदत होईल. आठवडाभर नियमित मसूर डाळीचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा अतिशय सुंदर आणि देखणी होण्यास मदत होईल. मसूर डाळीमध्ये असलेले नैसर्गिक गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते. याशिवाय टॅन कमी करून त्वचा चमकदार आणि सुंदर करते. त्वचेवर आलेले काळे डाग कमी करण्यासाठी जेष्ठमध पावडर खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा नियमित मसूर डाळ चेहऱ्यावर लावावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Dont have much time to visit a parlour for a facial then apply masoor dal to your face using this method to get a glowing complexion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:26 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर
1

Diwali Utane Recipe: दिवाळीतील अभ्यंग स्नानासाठी घरीच तयार करा शाही सुगंधी उटणं! त्वचा होईल मऊ आणि सुंदर

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!
2

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!

ब्रायडल ग्लोसाठी महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी नियमित प्या ‘हे’ ज्यूस, महिनाभरात त्वचा होईल सुंदर
3

ब्रायडल ग्लोसाठी महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी नियमित प्या ‘हे’ ज्यूस, महिनाभरात त्वचा होईल सुंदर

Skin Care Tips: अंडरआर्म्सच्या काळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काखेतील त्वचा होईल उजळदार
4

Skin Care Tips: अंडरआर्म्सच्या काळेपणाकडे अजिबात करू नका दुर्लक्ष? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काखेतील त्वचा होईल उजळदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.