चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे पिंपल्स येत असतात. त्वचेवर लावले जाणारे वेगवेगळे स्किन केअर प्रॉडक्ट, आहारात खाल्ले जाणारे तेलकट किंवा तिखट पदार्थ आणि पोट स्वच्छ न झाल्यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स हळूहळू मोठे होतात, ज्याचे डाग लवकर चेहऱ्यावरून लवकर निघून जात नाहीत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेवर नेहमीच पिंपल्स किंवा ऍक्ने येत असतात. वातावरणातील बदल, सतत येणारा घाम आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. या दिवसांमध्ये महिलांमध्ये प्रामुख्याने दिसून येणारी समस्या म्हणजे ‘फंगल अॅक्ने’. त्वचेवर फंगल अॅक्ने आल्यानंतर अनेक महिला पिंपल्स समजून दुर्लक्ष करतात.(फोटो सौजन्य – istock)
नियमित करा ‘या’ लाल फळाच्या रसाचे सेवन! केसांच्या वाढीसाठी ठरेल वरदान, कायमच दिसतील सुंदर केस
पिंपल्स आणि फंगल अॅक्ने हे त्वचेचे दोन वेगवेगळे आजार आहेत. त्यामुळे पिंपल्स आणि फंगल अॅक्ने झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. बॅक्टेरिया आणि रोम छिद्रांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचेवर वारंवार पिंपल्स येतात. तसेच फंगल अॅक्ने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने येतात. यीस्ट नावाच्या Malassezia फंगसमुळे त्वचेवर ऍक्ने वाढण्याची शक्यता असते. पिंपल्स प्रामुख्याने कपाळावर, नाकावर आणि हनुवटीवर येतात. तसेच फंगल अॅक्ने चेहरा, पाठ आणि छातीवर येतात.
पिंपल्स आल्यानंतर त्वचेवर हलकीशी सूज येऊ लागतो. तसेच यामुळे वेदना वाढतात. फंगल अॅक्ने आल्यानंतर चेहऱ्यावर वारंवार खाज आणि जळजळ वाढू लागते. फंगल अॅक्ने प्रामुख्याने कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतात.
Anti-Aging Treatment: अँटी एजींग ट्रिटमेंटसाठी पाच कोटींचा खर्च; पण पुढे जे झालं ते…..
फंगल अॅक्ने आल्यानंतर त्वचेवर कोणत्याही स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करू नये. यामुळे ऍक्ने कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागतात. हे पिंपल्स आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. फंगल अॅक्नेपॅरॉक्साइड किंवा सॅलिसिलिक अॅसिडचा वापर करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याने अॅंटी-फंगल क्रीम किंवा घरगुती उपाय केल्यास पिंपल्स कमी होतात.