अँटी एजींग ट्रिटमेंटसाठी पाच कोटींचा खर्च; पण पुढे जे झालं ते.....
China News: चीनमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलीने ड्रेस बसत नसल्यामुळे खाणे-पिणे बंद केले आणि ती गंभीर आजारी पडली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता, चीनमधील अनहुई प्रांतातील हेफेई शहरात राहणाऱ्या चेंग नावाच्या तरुणाने तरुण दिसण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत जवळपास ५ कोटी रुपये (४३ लाख युआन) ब्युटी सलूनमध्ये खर्च केले, परंतु हा निर्णय त्याच्यासाठी महागडाच नव्हे तर आणि आरोग्यसाठीही धोकादायक ठरला.
चीनमध्ये चेंग नावाच्या एका तरुणाने तरुण दिसण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी सलग दोन वर्षांत ब्युटी सलूनमध्ये तब्बल ५ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला. एप्रिल २०२३ मध्ये चेंगची एका ब्युटी सलून मॅनेजरशी भेट झाली. सलून चालकाने त्याला वजन कमी करण्यास आणि तरुण दिसण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला मसाज व सौंदर्य उपचारांच्या नावाखाली सलूनकडून त्याला सातत्याने पैसे जमा करण्यासाठी सतत दबाव आणला जाऊ लागला. त्यासाठी त्याने अनेकदा एनीमा, अॅक्युपंक्चर, ‘स्किन डिटॉक्स’ यांसारख्या परवाना नसलेल्या उपचारांवर प्रचंड पैसा खर्चही केला.
MBBS डॉक्टरने बाबा रामदेवांसमोर जोडले हात, शुगर झाली ‘एकदम ओके’, कसा मिळाला फायदा?
चेंगच्या म्हणण्यानुसार, सलूनचे कर्मचारी—जे बहुतेक तरुण होते—त्याच्यासमोर हात जोडून सांगायचे की ते गरीब आहेत, भाडे देऊ शकत नाहीत आणि त्यांच्या पालकांना आधार देण्यासाठी ग्राहकांच्या पैशावर अवलंबून आहेत. फक्त एका एनीमा कोर्ससाठी अंदाजे ३ लाख युआन (सुमारे ४२,००० डॉलर्स) आकारले गेले. शरीराच्या एका भागाच्या मालिशसाठी ५००-६०० युआन आणि ‘पोटातील ओलावा काढणे’ अशा उपचारांसाठी १,००० ते २,००० युआन आकारण्यात आले. जानेवारी महिन्यात त्याने एकाच वेळी ३.८८ लाख युआन सलूच्या खात्यात जमाही केले, तर मार्चअखेर खात्यात सुमारे १७ लाख युआन जमा केले. पण त्यानंतरही चेंगच्या प्रकृतीत फारसा फरक पडला नाही. याउलट त्याला आरोग्याच्या दुसऱ्या समस्या उद्भवू लागल्या
या उपचारांनंतर चेंगला अतिसार, चेहऱ्यावर जखमा व इंजेक्शनच्या खुणा अशा गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या. जेव्हा त्याने चौकशी केली, त्यावेळी मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली. सलूनकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसल्याचे उघड झाले, त्यानंतर चेंगने सलूनचालकाकडे पैसे परत मागितले असता सलूनचालकाने पैसे परत देण्यास नकार दिला.