नियमित करा 'या' लाल फळाच्या रसाचे सेवन! केसांच्या वाढीसाठी ठरेल वरदान
वातावरणातील बदल, कामाचा वाढलेला तणाव, बिघडलेले मानसिक आरोग्य आणि आहारात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता आरोग्यासोबतच शरीरालासुद्धा हानी पोहचवते. त्यामुळे कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन करून आनंदी जीवन जगणे आवश्यक आहे. केसांच्या वाढीवर परिणाम झाल्यानंतर बऱ्याचदा केस तुटणे किंवा केसांमध्ये कोंडा वाढण्याची जास्त शक्यता असते. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केसांना सतत खाज येणे, टाळूवरील इन्फेक्शन इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंटस किंवा महागड्या प्रॉडक्टचा वापर केसांसाठी करतात. पण यामुळे केस आणखीनच कोरडे आणि निस्तेज होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
Anti-Aging Treatment: अँटी एजींग ट्रिटमेंटसाठी पाच कोटींचा खर्च; पण पुढे जे झालं ते…..
हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागली आहे. सतत केस गळून टक्कल पडेल की काय अशी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण होते. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. मात्र हेअर केअर प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती आणि नैसर्गिक पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी कोणते फळ अतिशय फळ अतिशय प्रभावी ठरते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळाच्या सेवनामुळे शरीर स्वच्छ होण्यासोबतच त्वचेवरील हरवलेला ग्लो कमी होण्यास मदत होते.
केसांच्या समस्या कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. शरीरात निर्माण झालेली पोषक घटकांची कमतरता केस आणि त्वचेवर गंभीर परिणाम करतात. त्यामुळे आहारात कॅल्शियम, प्रोटीन आणि विटामिन सी युक्त पदार्थांचे नियमित सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या दूर होतात. केसांच्या निरोगी वाढीसाठी नियमित बीटच्या रसाचे सेवन करावे. बीटमध्ये असलेले घटक शरीर आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात.
हेल्दी पेय बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बीट, सुकलेल्या जास्वंदीची फुले आणि केळी टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एकदा बारीक वाटा. तयार करून घेतलेल्या रसाचे नियमित सेवन केल्यास महिनाभरात लगेच फरक दिसून येईल. केसांच्या सर्वच समस्या दूर होऊन केस लांबलचक आणि सुंदर होतील. बीटमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, यामुळे केसांची मूळ मजबूत आणि निरोगी राहतात. याशिवाय जास्वदींची फुले केसांच्या समस्यांपासून आराम मिळवून देतात.