
जेवणाआधी प्या ही टेस्टी स्मूदी; वजन झपाट्याने कमी होऊन अंथरुणात पडताच लागेल शांत झोप
चुकीच्या आणि त्रस्त जीवनशैलीमुळे आजकाल अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देत आहेत. ही समस्या हळूहळू वाढत जाऊन मग एक मोठे रूप घेते. हळूहळू वाढत चाललेले आपले वजन जरी आता आपल्याला सामान्य वाटतं असले तरी भविष्यात याचे परिणाम गंभीर दिसून येतात. लठ्ठपणामुळे श्वास घेण्यास प्रॉब्लेम होतो तसेच शरीराला लवकर थकवा जाणवू लागतो. यासोबतच रात्री लवकर झोप न येणे ही समस्याही अनेकांमध्ये वाढत आहे. संपूर्ण दिवस ऍक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला रात्रीची शांत झोप मिळणे फार गरजेचे आहे.
जर तुम्हीही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि तुम्हाला रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर यातएक चविष्ट स्मूदी तुमची मदत करेल . होय, बरेचदा लोक रात्रीच्या वेळी अनहेल्दी स्नॅक्स खातात, ज्यामुळे वजन तर वाढतेच पण पचनक्रियाही बिघडते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही आम्ही सांगत असलेली ही चविष्ट आणि हेल्दी स्मूदी रात्रीच्या जेवणाच्या 2 तास आधी प्यायली तर तुम्हाला याचा फायदाच फायदा झालेला पाहता येईल. यामुळे तुमचे मेटाबॉलिजम वाढेल आणि तुम्हाला चांगली झोपही मिळेल. चला तर मग ही स्मूदी कशी बनवायची ते जाणून घेऊया.
साहित्य
कृती
जेवणाच्या 2 तास आधी या स्मूदीचे सेवन करा, जेणेकरून ते शरीरात योग्यरित्या शोषले जाईल. झोपण्यापूर्वी खूप जड अन्न खाऊ नका, जेणेकरून त्याचा प्रभाव पूर्णपणे दिसून येईल. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर हेवी डिनरऐवजी तुम्ही या स्मूदीचे सेवन करू शकता