(फोटो सौजन्य: Pinterest)
बदलत्या वातावरनुसार आपल्या शरीरातही अनेक बदल घडू लागतात. अनेकदा कामाच्या व्यापामुळे अथवा आजकाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोक फार कमी वयातच अनेक आजारांनी ग्रस्त आहेत. अशात आपल्या खाण्या-पिण्यावर लक्ष देणे आणि व्यायाम करणे फायद्याचे ठरते. आता ही तर झाली शारीरिक आरोग्याची काळजी मात्र तुम्हाला माहिती आहे का? शारीरिक आरोग्यासहीत वेळोवेळी मानसिक आरोग्यचीही तितकीच काळजी घ्यायला हवी. अनेकदा मानसिक तणावामुळे आपले बाह्य शरीरही खराब होऊ लागते. निरोगी जीवनशैलीसाठी मानसिक आणि शारीरिक दोन्हींची योग्य काळजी राखणे गरजेचे आहे. अशात फक्त योग्य आहार आणि व्यायामच नाही तर काही इतर गोष्टीही यात तुमची मदत करू शकतात. जसे की पार्टनरची मिठी…
मिठी मारल्याने नात्यातील प्रेम वाढते आणि ते मजबूत होतेच, परंतु यामुळे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. वास्तविक, मिठी मारल्याने तुमचा रक्तदाब आणि हृदय गती कमी होते. याशिवाय, हृदयाशी संबंधित कार्य देखील सुधारते. इतकंच नाही तर हगिंग कॉर्टिसोलची पातळी कमी करून तणाव कमी करण्याचे काम करते. अनेक संशोधने असेही दर्शवतात की मिठी मारल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदे मिळतात. जर तुमच्या आयुष्यात अशी कोणतीही व्यक्ती नसेल जिच्याशी मिठी मारून तुम्हाला आराम मिळेल किंवा तुम्ही कोणालाही सहज मिठी मारणारी व्यक्ती नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीऐवजी तुमच्या पाळीव प्राण्याला मिठी मारू शकता. हेदेखील तितकेच फायदेशीर ठरू शकते. चला तर मग या लेखात मिठी मारण्याचे फायदे जाणून घेऊया.
आज किरकोळ वाटणाऱ्या या सवयी भविष्यात बनू शकतात Breakup चे कारण; रिलेशनशिपमध्ये कधीही करू नका या चुका
लव्ह हार्मोन्स होतात रिलीज
Bupa UK च्या अहवालानुसार, जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट पद्धतीने इतरांशी संवाद साधतो तेव्हा आपला मेंदू ऑक्सिटोसिन नावाचे रसायन सोडतो, ज्याला लव्ह किंवा हग हार्मोनही म्हटले जाते. हे तेव्हाही रिलीज होते, जेव्हा तुम्ही मिठी मारता किंवा मिठी मारायला जाता. हे केवळ तुमचे नाते सुधारत नाही तर तणावाचा सामना करण्यास देखील मदत करते.
ब्लड प्रेशर होतो कंट्रोल
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 20-सेकंदाची मिठी रक्तदाब कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. जर तुम्ही एखादे धकाधकीचे काम करणार असाल तर ते करण्यापूर्वी मिठी मारणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
प्राजक्ता कोळी कर्जत येथे करणार डेस्टिनेशन वेडिंग, फिरण्यासाठीचे परफेक्ट ठिकाण, मुंबईहून कसे जायचे?
मूड रिफ्रेश करून चिंता होते कमी
मिठी मारल्याने तुमचा मूड रिफ्रेश होतो, यामुळे खराब मूडही चांगला होतो. एका अभ्यासानुसार, मिठी मारल्याने वाईट मूड सुधारण्यास मदत होते विशेषतः तेव्हा जेव्हा तुमची दुसऱ्या व्यक्तीशी भांडण झाले असेल. मिठी मारून चिंता नियंत्रित करता येते. याशिवाय, यामुळे एकटेपणाची भावना कमी होते आणि तुम्हाला आनंदही होतो.