
कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात 'या' गंभीर समस्या
अन्न, पाणी, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. नियमित ३ लिटर पेक्षा जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्यास तुमचे शरीर कायमच हायड्रेट राहील. पण बऱ्याचदा पाण्याचे सेवन केले जात नाही. कमी पाणी प्यायल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम दिसून येतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी प्यावे. कमी पाण्याच्या सेवनामुळे डिहायड्रेशन, त्वचेवरील ग्लो कमी होणे, लघवी करताना जळजळ होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवतात.(फोटो सौजन्य – istock)
आपलं शरीर साधारणपणे ७० टक्के पाण्याने बनलेले असते आणि पाणी आपल्यासाठी जीवनदायी आहे, पाणी फक्त तहान भागवण्यासाठीच नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयव नीट काम करण्यासाठी मदत करते. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक पुरेसे पाणी पित नाहीत. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही, तेव्हा तोंडातील ओलसरपणा कमी होतो; त्यामुळे तोंडात जंतू वाढू लागतात आणि श्वासाला दुर्गंधी येऊ लागते. पाणी प्यायल्याने तोंड स्वच्छ आणि ताजे राहते, म्हणूनच जर वारंवार तुमच्या तोंडातून वास येत असेल, तर ते शरीरात पाण्याची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. आपलं शरीर साधारणपणे ७० टक्के पाण्याने बनलेले असते आणि पाणी आपल्यासाठी जीवनदायी आहे, पाणी फक्त तहान भागवण्यासाठीच नाही, तर शरीरातील प्रत्येक अवयव नीट काम करण्यासाठी मदत करते. पण, आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक पुरेसे पाणी पित नाहीत. कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण ते टाळू आणि केसांच्या मुळांपर्यंत पोषण पोहोचवते. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर टाळू कोरडा होतो आणि केस कमजोर होऊन लवकर गळू लागतात. कोणतेही दुसरे कारण नसताना जर तुमचे केस अचानक जास्त गळत असतील, तर दुर्लक्ष करू नका.
कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरात रक्ताभिसरण नीट होत नाही, त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ लागते आणि हळूहळू अॅनिमियासारखी समस्या निर्माण होऊ शकते. अॅनिमिया झाल्यास शरीरात अशक्तपणा, चक्कर येणे अशा तक्रारी दिसून येतात.
मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरेल आरोग्यदायी ‘लाफ्टर थेरपी’, कायमच राहाल आनंदी
पाण्याची कमतरता आपल्या मेंदूवरही परिणाम करते. कमी पाणी प्याल्यामुळे डोकेदुखी, चिडचिड, मूड बदलणे, ताणतणाव आणि घबराट यांसारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे मेंदू शांत आणि सक्रिय ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
Ans: सामान्यतः ३ ते ४ लिटर (८ ते १० ग्लास) पाणी पिणे आवश्यक आहे.
Ans: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे, जे शरीराला ऊर्जा देते.
Ans: कोमट पाणी पचनक्रिया सुधारते, शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते, चयापचय वाढवते.